वैभववाडी
मुंबई विद्यापीठ अंतर्गत आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या जिल्हास्तरीय उडान महोत्सव-२०२३ मध्ये वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित, आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाने सादर केलेल्या ‘तरुणाईचे वेड’ या पथनाट्याला दुसरा क्रमांक मिळाला आहे.
मुंबई विद्यापीठ अंतर्गत आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सव अर्थात उडान महोत्सव-२०२३ गुरूवार दि.२ फेब्रुवारी रोजी श्री.लक्ष्मी हळबे महाविद्यालय दोडामार्ग येथे तर शुक्रवार दिनांक ३ फेब्रुवारी रोजी कणकवली महाविद्यालय येथे अशा दोन ठिकाणी संपन्न झाला. कणकवली येथे संपन्न झालेल्या उडान महोत्सवात जिल्ह्यातील १७ महाविद्यालयांनी पथनाट्य, पोस्टर मेकिंग, वक्तृत्व व क्रिएटिव्ह रायटिंग इ. स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता.
वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील या विभागातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘तरुणाईचे वेड’ या पथनाट्याला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. या पथनाट्यामध्ये कु.विशाखा रावराणे, प्रफुल्ली दळवी, वैभवी बाणे, अक्षता भरडे, अर्पिता चव्हाण, गौरी गांधी, सृष्टी जाधव, योगेश्री केळकर, विणा चिरपूटकर,सिध्दी माईणकर प्रज्ञा कोलते, प्रणाती मिराशी, आदिती मोरे, भाग्यश्री पांचाळ, तेजल रावराणे, प्राजक्ता साटम व निकिता चव्हाण यांनी सहभाग घेतला होता.
या सहभागी व विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष मा.विनोदजी तावडे, सर्व विश्वस्त व पदाधिकारी, प्राचार्य र्डॉ. सी. एस. काकडे, प्राध्यापक व शिक्षकेत्तर यांनी केले आहे.
या विभागाचे विस्तार कार्यशिक्षक प्रा.पी.एम.ढेरे, प्रा.आर.बी.पाटील तसेच प्रा.संजीवनी पाटील, डॉ.बी.डी.इंगवले, प्रा.एस.एन.पाटील व प्रा.एन. ए.कारेकर यांचे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन लाभले.