You are currently viewing लता दिदी

लता दिदी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री लैलेशा भुरे यांनी लता दीदींच्या पहिल्या पुण्यस्मरण दिनी लिहिलेली अप्रतिम काव्यरचना*

 

*लता दिदी*

**************************

 

जगात सा-या आहे

लता दिदींची किर्ती

नाव त्यांचे घेताच

मनी जागते स्फुर्ती

 

जाहली गान कोकिळा

जाहली ती भारतरत्न

त्यामागे होते त्यांचे

अपार कष्ट आणि प्रयत्न

 

लता दिदींसारखी श्रेष्ठ गायिका

आजवर ना कोणी पाहिली

वीसहून अधिक भाषांमधून

तीस हजारांहून अधिक गाणी गायिली

 

लाभले त्यांना जन्मजात

स्वरांचे मधुर लेणे

न भूतो न भविष्यती

दुसरी लता होणे

 

एक सूर्य, एक चंद्र

आणि एकच लता दिदींचा स्वर

करोडोंच्या मनात त्यांच्या

स्मृती करून बसल्या घर

 

घुमतात आसमंती

त्यांनी गायिलेली अजरामर गाणी

किती महान व्यक्तिमत्त्व

मात्र साधी होती राहणी

 

झिजल्या त्या आयुष्यभर

बनून सुवासिक चंदन

महान गायिकेला

माझे विनम्र अभिवादन

**************************

लैलेशा भुरे

नागपुर

प्रतिक्रिया व्यक्त करा