सावंतवाडी
येथील सालईवाडा परिसरात एका घरातून मोबाईल, सोन्याची चेन व व्यायाम करण्याचे लोखंडी डंबेल्स मिळून एकूण ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी सावंतवाडी पोलिसात दिलेल्या तक्रारीनंतर साजिद ऊर्फ मुन्ना इसाक शेख (रा. बिरोडकर टेम्ब ) याला ताब्यात घेत त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.