You are currently viewing नांदगाव ग्रामपंचायतचे लिपिक लक्ष्मीकांत मोरजकर यांचे निधन

नांदगाव ग्रामपंचायतचे लिपिक लक्ष्मीकांत मोरजकर यांचे निधन

कणकवली

नांदगाव मोरयेवाडी येथील श्री. लक्ष्मीकांत उर्फ नूतन सुधाकर मोरजकर ( वय ३८) याचे आकस्मिक निधन झाले.
लक्ष्मीकांत मोरजकर हे नांदगाव ग्रामपंचायत कार्यालयात गेली 15 वर्षे लिपिक या पदावर काम करत असल्याने त्याचा चांगला जनसंपर्क होता. मनमिळाऊ व हसतमुख स्वभावाचे लक्ष्मीकांत नूतन या टोपण नावाने नांदगाव परिसरात परिचित होते. त्याच्या पश्चात वडील, आई, भाऊ, बहीण, काका,काकी,भावजय, भावोजी असा परिवार असून निवृत्त एस.टी.चालक सुधाकर मोरजकर यांचे ते ज्येष्ठ पुत्र होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine − 3 =