कणकवली
असं म्हटलं जातं की, राजकारणात राहून समाजकारण करणे शक्य नसते. मात्र या उलट करून दाखवल आहे ते जि. प. माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी. आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील मुल शिकावीत, मोठी व्हावीत आणि ती आपल्या ध्येय धोरणांपर्यंत पोहोचावी. यासाठी नेहमी धडाडीचे प्रयत्न करत असलेले संदेश उर्फ गोट्या सावंत व त्यांच्या पत्नी जि.प.सिंधुदुर्गच्या माजी अध्यक्ष संजना सावंत. सावंत कुटूंबीय हे नेहेमीच राजकारणापलीकडे समाजाला, शाळकरी मुलांना तसेच इतर गरजुना काहीतरी देण्याचे प्रयत्न करत असतात.
२०१८ पासून शालेय विद्यार्थ्यांच्या बौद्धिकतेसाठी काहीतरी नवीन करण्याचा त्यांचा मानस..! त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रत्नांचा शोध घेणारी सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) परीक्षा सुरू केली. आज रविवार ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत जिल्ह्यातील २३ परीक्षा केंद्रावर संपन्न झाली. या परीक्षेत २ री, ३ री, ४ थी, ६ वी, ७ वी या इयत्तांसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी जिल्हा भरातून ७५४२ विद्यार्थी सहभागी झाले .
सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) परीक्षेचे औपचारिक उद्घाटन मुख्य परीक्षा केंद्र – विद्यामंदिर हायस्कूल, कणकवली येथे पत्रकार तसेच महाराष्ट्र माझा न्युज चॅनलचे संपादक विजय गांवकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले महाराष्ट्र माझा न्युज चॅनलचे संपादक विजय गांवकर यांनी युवा संदेश प्रतिष्ठानच्या उपक्रमांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पुढे बोलताना गावकर म्हणाले की, विविध क्षेत्रात विशेषतः भावी पीडिला योग्य दिशा देण्याचे काम, त्यांच्या पंखात फिनिक्स पक्षाप्रमाणे आत्मविश्वास , ताकत देण्याचे काम संदेश सावंत व संजना सावंत यांच्याकडून विविध उपक्रमांतून होत आहे. सिंधूरत्न टॅलेंट सर्च परीक्षा सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित न रहाता संपूर्ण कोकणात घेण्याचा मानस त्यांनी आज झालेल्या सिंधूरत्न टॅलेंट सर्च परीक्षा उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला. मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी “सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च” परीक्षा बाळगुटी ठरणार आहे. संपूर्ण कोकणच्या विद्यार्थ्यांना या अनमोल उपक्रमाच्या माध्यमातून फायदा होईल, अशा भावना श्री. गांवकर यांनी व्यक्त केल्या
दरम्यान बोलताना संदेश (गोट्या) सावंत म्हणाले की, शैक्षणिक उपक्रमातील शिक्षकांच्या योगदाना बद्दल आभार व्यक्त करतो. कारण शिक्षण क्षेत्रातील कोणतेच काम हे शिक्षकांशिवाय शक्य नाही. आमच्या कार्यात शिक्षकांचा देखील खूप मोठा मोलाचा वाटा आहे. तसेच सिंधुरत्न टॅलेन्ट सर्च परिक्षा सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादीत न राहता येत्या शैक्षणिक वर्षापासून रत्नागिरी जिल्हात देखील ही परीक्षा सुरू करून लवकरच संपूर्ण कोकणात ही परीक्षा सुरू करू असा विश्वास श्री. सावंत यांनी या कार्यक्रमादरम्यान व्यक्त केला.
यावेळी माजी. जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत (संस्थापक अध्यक्ष युवा संदेश प्रतिष्ठान), किरण गांवकर, संतोष जाधव, विजय मसुरकर केंद्रप्रमुख, टोनी म्हापसेकर, सुहास सावंत आदी मान्यवर तसेच विद्यार्थी पालकवर्ग उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक एसटीएस परीक्षा प्रमुख सुशांत मर्गज यांनी केले तर सुत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख अडीज लाख रुपयांची बक्षिसे, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच ६ वी व ७ वी मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना लॅपटॉप बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे.
तसेच यावर्षीक्सहा परीक्षेची उत्तरपत्रिका ओएमआर पद्धतीची असल्याने संगणकाद्वारे तपासली जाणार आहे. तसेच परीक्षेच्या निकाला दिवशी पालक / शिक्षक / विद्यार्थी यांना निकाल व सोडवलेली उत्तरपत्रिका ऑनलाईन पाहता येणार आहे.
अधिक माहितीसाठी एसटीएस परीक्षा प्रमुख सुशांत सुभाष मर्गज यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन युवा संदेश प्रतिष्ठाचे संस्थापक अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत व अध्यक्षा संजना संदेश सावंत यांनी केले आहे .