*”काव्य निनाद साहित्य मंच, पुणे समूहाच्या लेखिका कवयित्री योगिनी पैठणकर लिखित अप्रतिम काव्यरचना*”
*”हळदीकुंकू*”
__________________________
मी एक अभागी
समाजाने झिडकारलेली
थोडीशी आसुसलेली
कपाळी ना कुंकू, ना टिकली
ना मला कधी आमंत्रण
ना शुभकार्यात निमंत्रण
दुरुनी उसासे टाकते
लांबून सवाष्णी बघते
समाजाने दूर लोटले
हळदीकुंकवास त्यागले
रोज दर्पणात बघते मी
जुन्या आठवणीतच रमते
का बरे मलाच असा अभिशाप?
काय होते दुर्दैव ,काय ते पाप?
येती बायका त्या नटूनथटून
मी तर गेली आता पार विटून?
नको खरच आता साजशृंगार
कुंकवाचा का तो व्हावा भार?
मन व्यथीत होते जेव्हा,
हळदीकुंकवाचा करंडा पहाते
नका उपेक्षू त्या महीलांना
कुंकवाचा मान द्या नं हो त्यांना.
*योगिनी वसंत पैठणकर, नाशिक.*