आंगणेवाडीत देवीच्या दर्शनासाठी भाविकांचा उसळला जनसागर
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारी व नवसाला पावणारी देवी,अशी ख्याती असलेल्या आंगणेवाडी येथील भराडी देवीचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आज सकाळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी कार्यकर्त्यांसमवेत श्री भराडी देवीचे दर्शन घेतले. तसेच जत्रोत्सवात विविध ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या. शिवसेना खासदार अरविंद सावंत, खासदार राजन विचारे, खासदार विनायक राऊत, माजी मंत्री आ. अनिल परब, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनीही उपस्थित राहून भराडी मातेचे दर्शन घेतले.
भराडी देवीने देश भरातील भक्तांवर आपल्या श्रद्धेचे गारुड घातले आहे. म्हणूनच देश भरातील कोट्यावधी भक्तगण दर्शनासाठी आंगणेवाडीत आवर्जून उपस्थित राहतात. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही भक्तांच्या आलोट गर्दीत आंगणेवाडीची हि यात्रा संपन्न होत आहे.आंगणेवाडीत देवीच्या दर्शनासाठी जणू भाविकांचा जनसागर उसळला आहे. आंगणेवाडीतील देवस्थान कमिटी, स्थानिक आंगणे कुटुंबीय व नागरिकांनी या जत्रोत्सवाचे उत्कृष्ट असे नियोजन केले आहे.
आंगणे वाडीत आलेल्या भविकांना जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्या माध्यमातून दरवर्षीं प्रमाणे पाणी वाटप करण्यात आले त्या सेवेत आ. वैभव नाईक सहभागी झाले. याप्रसंगी राजकीय नेतेमंडळी व अनेक चाकरमानी, जिल्हावासीय यांच्याशी त्यांच्या भेटीगाठी झाल्या.
यावेळी शिवसेना युवानेते संदेश पारकर,युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, प्रदीप गावडे, शिवसेना तालुका प्रमुख हरी खोबरेकर,महेश कांदळगावकर, मंदार केणी, यतीन खोत, गणेश कुडाळकर, बाबी जोगी राजेश गावकर, छोटू ठाकूर, राजू परब, महिला तालुका प्रमुख दीपा शिंदे,युवतीसेना समन्वयक शिल्पा खोत,अमित भोगले, विजय पालव,पराग नार्वेकर आदींसह शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित मोठ्या संख्येने होते.