You are currently viewing क्रिमीयन काॅगो हिमोरेजिक

क्रिमीयन काॅगो हिमोरेजिक

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

*भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समिती (पश्चिम महाराष्ट्र) उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा, संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे लिखित लेख*

*क्रिमीयन काॅगो हिमोरेजिक*

हे रोगाचे नाव आपणांस माहिती आहे कां?? असा भयानक रोग जो पाळीव जनावरे यांच्यापासून लोकांना होतों ‌
आपल्या देशात शेती हे मुख्य साधन आहे. त्याबरोबरच आपण आपल्या जीवनावश्यक. दैनंदिन गरजा भागविण्यासाठी पशुपालन. कुक्कुटपालन. हे व्यावसाय प्रामुख्याने केले जातात. त्यानुसार जनावरांना शेतात पाळणे गरजेचे आणि सोपं आहे कारणं जनावरांना पाणी चारा व सुरक्षेच्या दृष्टीने शेतात आजही बंदिस्त गोठा करून पालन केले जाते.
‌‌ पशुसंवर्धन. पशुपालन. यापासून आपणांस आपली नितांत गरज असणारी ती म्हणजे दुध कारण दुध ही आपली गरज यातून पार पडत असतें. म्हणून आपल्या देशात जनावरांना पशुधन म्हणलं जातं.
‌ आज वाढती लोकसंख्या ध्यानात घेता शेतीचे क्षेत्र कमी झाले. आणि लोकांना राहण्यासाठी शेतीचे वास्तविक रहिवासी क्षेत्रात रुपांतर झाले. आणि आज जनावरं पाळण्यासाठी काही लोकानी आपल्या घराजवळ आणि राहत्या लोकवस्ती मध्ये मध्यवर्ती ठिकाणी आज मोठ मोठें जनावरांचे गोठे बांधले आहेत. त्यामुळे शेण मुताचा उग्र वासाने आजुबाजुला रहिवासी लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या वासाने उत्पती होणारें विविध किटक. माश्या. पिसवा. व इतर मानवी जीवनास घातक कीटक निर्मिती होत आहे. यातील सर्वात घातक कीटक आहे तो म्हणजे “” गोचीड “”यामुळे जनावरांना व लोकांना भयानक संसर्गजन्य आजार होत आहेत. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जेथे जेथे जनावरांचे गोठे आहेत तेथे गोचीड निर्मिती होतेच आणि संध्याकाळच्या वेळेस हे सर्व गोचीड आजूबाजूला संक्रमण करताना आपणांस दिसत नाहीत पण हे रात्रीच्या वेळी गोठ्याच्या बाहेर निघतात आणि जवळच रहिवासी लोकांच्या घरांत आढळत आहेत यामुळे “” क्रिमीयन काॅगो हिमोओरेजिक “” नावाचा संसर्गजन्य तापाचा आजार आजही लोकांमध्ये पसरत आहे. यामुळे आज लोकांचे जनजीवन धोक्यात आले आहे. दुधाचे. तुप. दही. लोणी. ताक. असे दुधापासून निर्माण होणारे पदार्थ यापासून पैसा मिळवत आहेत. यांच्यामुळे जनजीवन धोक्यात आले आहे आणि येत आहे. जे लोक या पशुपालन व्यवसाय करून पैसा मिळवतात त्यांनी त्या जनावरांच्या गोठ्याची स्वच्छता याकडे प्रामुख्याने लक्ष देणं गरजेचं आहे.
गोचीड हा रक्त शोषणारा कीटक वर्गातील प्राणी आहे.तो बाह्य परजीवी कीटक आहे.तो रक्तपिपासू आहे.तो सहसा प्राण्यांच्या/जनावरांच्या अंगावर राहतो.महाराष्ट्रात झालेल्या एका गायी व म्हशींच्या अभ्यासात सुमारे ६७% ते ८७% प्राण्यांच्या अंगावर विविध प्रकारच्या गोचिड होत्या भारतात सुमारे १६० प्रकारच्या गोचिड आढळून येतात.त्यापैकी ‘बुफिलस हायलोमा’ ‘एम्ब्लीओमा’ ‘हेम्याफायसीलस’ ‘रिफीसीफॅलस’ इत्यादी गोचिड जनावरांच्या रोगांचे दृष्टीने जास्त हानीकारक आहेत
क्रिमीयन कॉगो हिमोरेजिक फीवर हा विषाणूजन्‍य असून तो गोचिडा पासून संक्रमित होतो.अलिकडील काळात या आजाराचे बरेच तीव्र स्‍वरुपाचे तापाचे उद्रेक आढळून आलेले आहेत . कोरोना आजार अतिशय भयानक होता त्याच्या पाठोपाठ हा गोचीड ताप हा आजारांचे रुग्ण आज सापडायला लागले आहेत.
या आजारामध्‍ये मृत्‍यूचे प्रमाण ४० टक्‍के पर्यत आहे.
या विषाणूचा प्रसार हा गोचिड व पाळीव प्राण्‍याच्‍या संपर्कामध्‍ये आल्‍यावर होतो
भारतामध्‍ये या आजाराचा पहिला रुग्‍ण जानेवारी २०११ मध्ये गुजरात येथे आढळून आलेला आहे.
या आजारासाठी कुठलीही लस मानवासाठी तसेच प्राण्‍यासाठी उपलब्‍ध नाही.
हा विषाणू हा जंगली तसेच पाळीव प्राणी गाय,म्‍हैस,शेळी इ. प्राण्यांच्या शरीरात राहतो.
प्राण्‍यांना या रोगाची लागण ही दुषित गोचिड चावल्‍यानंतर होते हा विषाणू याप्राण्‍यांच्‍यारक्‍तामध्‍ये साधारणतः आठवडाभर राहतो अशारितीने गोचिड – प्राणी – गोचिड हे जीवनचक्र चालू राहते
प्रसार
या विषाणूचा मानवामध्‍ये प्रसार हा दुषित गोचिड चावल्‍यानंतर किंवा दुषित प्राण्‍याच्‍या रक्‍ताशी संसर्गझाल्यानंतरच लोकांचे जीवन धोक्यात येते
मनुष्‍य ते मनुष्‍य अशी या रोगाची लागण जवळचा सहवास उदा. रक्‍तसंसर्ग, स्‍त्राव संपर्क किंवा शरीर दुषित रुग्‍णाच्‍या संपर्कामध्‍ये आल्यानंतर होते. रुग्‍णालयामध्‍ये पुरेशी काळजी न घेतल्‍यामुळे तसेच निर्जंतूक उपकरणाचा वापर न केलेमुळे या रोगाची लागण होण्‍याची सर्वाधिक शक्‍यता राहते. या रोगाचा पारेषण कालावधी हा १ ते ३ दिवस आहे व जास्‍तीत जास्‍त ९ दिवस दिसून येतो.
या रोगाच्‍या प्रमुख लक्षणामध्‍ये ताप, अंगदुखी,गुंगी, मानदुखी व मानेचा ताठरपणा, पाठदुखी, डोकेदुखी, डोळेदुखी किंवा डोळयांना प्रकाश न सोसणे ही आढळून येतात तसेच उलटी मळमळ, जुलाब, पोटदुखी व घसादुखीही आढळून येते. काही वेळा सतत झोप लागणे, नैराश्य. असे भयानक आजार गोचीड या परजीवी किटकापासून होतों.
अलीकडच्या काळात व्हायरल तापाचं वाढतं प्रमाण आणि त्याची सर्वसामान्यांच्या मनातील वाढती भीती पाहता व्हायरल फिव्हर (संसर्गजन्य ताप) म्हणजे नेमके काय आणि त्यावर मात करण्यास आपण कुठल्या साध्या-सरळ उपायांचा वापर करावा याची माहिती करून घेणं गरजेचं आहे. व्हायरल तापाचे दिवसेंदिवस वाढते प्रमाण मुख्य कारण आहे, वाढते औद्योगिकरण आणि त्याबरोबर वाढते वायू, जल प्रदूषण. व्हायरल फिव्हरचा प्रादुर्भाव मुख्यत: जून-जुलै ते डिसेंबर या सहा महिन्यात पहायला मिळतो. पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे आणि जागोजागी पाण्याचे साठे वाढल्याने किटकांची वाढ होताना दिसते. जे व्हायरल तापाच्या संक्रमणाकरता जबाबदार ठरतात. व्हायरल तापाचे मुख्य प्रकार म्हणजे स्वाइन फ्लू, डेंग्यू, चिकनगुनिया, गोचीड ताप.
मुख्य लक्षणं: ताप, सर्दी, खोकला, मळमळ, उलटी, थकवा, पोटदुखी, अंगदुखी, डोकेदुखी, अंगाला खाज येणं, रॅश येणं, सांधे दुखणं आणि या लक्षणांचा वेळीच उपचार न झाल्यास याचं रुपांतर गंभीर आजारात होऊ शकतं. ज्यामध्ये रुग्णाच्या शरीरात कुठेही रक्तस्त्राव होऊ शकतो. (नाक, डोळे मेंदू इ.) कमी रक्तदाबाचा त्रास, दम लागणं, फुफ्फुसाला सूज येणं, पोटात, छातीत पाणी साचणं इ. लक्षणं असू शकतात. त्यामुळे मुख्य लक्षणांची सुरुवात झाल्यावर २-३ दिवसात बरं न वाटल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे आणि योग्यवेळी रक्त आणि इतर आवश्यक तपासण्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करणं गरजेचं आहे.
व्हायरल तापात रक्त तपासणीमध्ये ज्या काही बाबी आढळून येतात त्यापैकी सर्व प्रथम म्हणजे रक्तपेशींचं प्रमाण कमी होणं. पांढऱ्या रंक्तपेशी या आपल्या शरीरात रक्त गोठव‌ण्याच्या प्रक्रियेतील प्रमुख घटक आहेत. रक्त तपासणीमध्ये बऱ्याचदा लिव्हर आणि किडनीलाही सूज येऊ शकते. त्यामुळे त्यांची काम करण्याची क्षमता कमी होऊ शकते.
चाचण्यांच्या रिपोर्टमुळे आणि रुग्णांमधील लक्षणांमुळे योग्य निदान करणं सोपं होतं.
प्लेटलेट्स कमी झाल्या की, मित्र परिवारात नातेवाईकांमध्ये चर्चेला उधाण येतं. जो तो स्वत:चे ऐकलेले, ऐकवलेले सर्व अनुभव सांगून रुग्णाला धीर देण्याऐवजी घाबरुन सोडतात. याचा परिणाम म्हणजे रुग्णही गोंधळतो, नातेवाइकही गोंधळतात आणि डॉक्टरलाही गोंधळात पाडतात.
प्रत्येक व्यक्ती आणि त्याची प्रतिकारक्षमता वेगवेगळी असते. शक्यतो लहान मुलं आणि अबालवृध्द यांच्यात प्रतिकारक्षमता कमी आढळून येते. त्यामुळेच या रुग्णामध्ये आजार आटोक्यात येण्यास वेळ लागतो अथवा आजार गंभीर स्वरुपाचा होण्याची शक्यता जास्त असते. व्हायरल ताप ५ ते ७ दिवसांपर्यंत येऊ शकतो. गोळ्यांनी तो तात्पुरता कमी होऊ शकतो. (डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय गोळ्या घेऊ नयेत.) ताप आणि इतर लक्षणं असेपर्यंत प्लेटलेटस् दिवसेंदिवस कमी होऊ शकतात. रुग्णाच्या लक्षणांमध्ये सुधारणा वाटू लागल्यानंतर प्लेटलेट्स आपोआप वाढण्यास सुरुवात होते.
प्लेटलेट्स या २०,००० पेक्षा कमी झाल्यास रक्तस्त्राव होण्याची शक्यता वाढत जाते. पण रक्तस्त्राव झाल्याची काहीही लक्षणं नसताना रक्तपेशी रूग्णाला देणं तितकंच अयोग्य आहे. कारण रक्तपेशी किंवा रक्ताचे कुठलेही घटक बाहेरुन चढवल्यास रुग्णाच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे रक्तपेशी देणं आवश्यक नसल्यास नातेवाईकांनीही त्या गोष्टीसाठी हट्ट धरु नये आणि डॉक्टरांनाच त्याबद्दल निर्णय घेऊ द्यावा.
गोचीड नियंत्रण करण्यासाठी गावठी उपाय सांगितले आहेत
वेखंड अथवा वचा या नावाने ओळखली जाणारी वनस्पती आहे. चेतना संस्थेच्या आजारात ही वनस्पती वापरली जाते. या वनस्पतीची पावडर उवा, गोचीड यांसारख्या बाह्य कृमींच्या नियंत्रणासाठी वापरावी. ही पावडर जनावरांच्या शरीरावर लावत असताना, केसांच्या उलट दिशेने लावावी, म्हणजे ती केसांच्या मुळांपर्यंत (त्वचेपर्यंत) पोचते.
कडुनिंब कडुनिंब तेल हे बाह्य परोपजीवींच्या नियंत्रणासाठी अत्यंत गुणकारी आहे. हे तेल जनावरांच्या शरीरावर लावावे. यास असणारा उग्र वास आणि चव यामुळे बाह्य परोपजीवींची भूक नष्ट होते. त्यामुळे ते मरतात.
करंज कडुनिंब तेलाप्रमाणेच करंज तेलामध्ये कीटकनाशक गुणधर्म आहेत. या तेलाचा वापर जनावराच्या शरीरावर लावण्याकरिता करावा. यामुळे बाह्य परोपजीवी मरतात.
सीताफळ सीताफळाची पाने व बी हे चांगले कीटकनाशक आहे. सीताफळाची पाने सावलीत वाळवून याची पावडर करावी किंवा बियांची बारीक पावडर करावी. पावडर जनावरांच्या शरीरावर केसांच्या उलट दिशेने लावावी.
बावनचा बावनचा किंवा बावची या वनस्पतीचे तेल कीटकनाशक म्हणून जनावरांच्या शरीरावर लावावे. यामुळे हे कीटक मरतात.
कण्हेर फुलांसाठी प्रसिद्ध असलेली ही वनस्पती. हिची पाने अथवा मूळ परोपजीवींच्या विरोधात अत्यंत गुणकारी आहे. याचा वापर जनावराच्या शरीरावर बाहेरून लावण्याकरिता करावा.
सिट्रोनेल्ला सिट्रोनेल्ला गवताचा उग्र वास असतो. सिट्रोनेल्ला, जिरॅनियम या तेलांचा वापर केल्याने बाह्य परोपजीवी जनावराच्या शरीरापासून दूर जातात.
निलगिरी तेल निलगिरी तेलाचा वापर अत्यंत उपयुक्त आहे. या तेलामुळे बाह्य परोपजीवी जनावरांच्या शरीरापासून दूर जातात. तसेच काही बाह्य परोपजीवी मरतात.
प्रकारच्या गोचिड जनावरांचे रक्त पितात.असे आढळून आले आहे कि, एक गोचिड सुमारे १ ते २ मि.ली. रक्त पिते. त्याचा कालावधी सुमारे ७ ते १४ दिवस राहू शकतो.मोठ्या जनावरांच्या शरीरावर अशा अनेक गोचिड असतात. त्यामुळे जनावरांना अशक्तपणा येतो.
गोचिडांच्या चाव्यामुळे जनावरांच्या शरीरावर जखमा होतात.त्वचा उघडी झाल्यामुळे त्यातून जंतूसंसर्ग होऊ शकतो.त्यामुळे ‘टिक पॅरालीसीस’ हा रोग जनावरांना होण्याची शक्यता असते.
जनावरांचे रक्तपेशीचे रोग जसे-‘बॅबीओसीस’,’ॲनाप्लासमोसीस’,’थायलेरीयाओसीस’, ‘एरलीसियोसीस’ व इतर या वर्गातील आजार प्राण्यांना गोचिडांमुळे होतात.गोचिडद्वारे या जंतूंचा फैलाव जनावरांमध्ये होतो व जनावरे रोगग्रस्त होतात.
गोचिडजन्य आजारांमुळे जनावरे रोगग्रस्त होतात व दगावतात.त्यांचे दूध व मांस उत्पादन घटते.पशुमालकांना आर्थिक नुकसान सोसावे लागते.
जगभरात गोचीडाचं नियंत्रण करण्यासाठी जैविक पर्यायही वापरले जातात. वेगवेगळ्या औषधी वनस्पतींच्या अर्कावर आधारित उत्पादने उपलब्ध आहेत. गोचिडीच नियंत्रण सूक्ष्मजीवांचा उपयोग करूनही शक्य आहे. बॅसिलस जातीच्या बॅक्टरीयासारखे वेगवेगळे जिवाणू, मेटारेझिम आणि बिव्हेरिया सारख्या बुरश्या आणि इपीएन सारख्या सूत्रकृमींवर आधारित उत्पादने, गोचिडाच्या नायनाटासाठी पाश्चिमात्य देशात वापरले जातात.
पूर्वी गावात जसं ठमीच्या केसातील उवा काढायला शेजारच्या काकू उत्साहाने मदत करायच्या, त्याच पद्धतीने, शत्रूचा शत्रू मित्र, या न्यायाने वेगवेगळे पक्षी, गांधीलमाश्या, मुंग्या आणि भुंग्यांचा, गोचीड नियंत्रणात फायदा होतो. प्राणी मोकळ्यावर चरायला फिरत असतील तर नैसर्गिकरित्या गोचीडसंख्या या मित्रांच्या मदतीमुळे फुकटातच नियंत्रित होते. पण सध्या काकू, सासूसुनांच्या सिरीयल मध्ये बिझी झाल्या आहेत, ठकीला उनियंत्रक रासायनिक शाम्पू मिळालाय. गाईम्हशीं मोकळ्यावर चरण्याऐवजी, गोठ्यात बंदिस्त झाल्या आहेत. त्यांनादेखील रासायनिक कीटकनाशकांचे इंजेक्शन आणि फवारे मिळालेत. आणि पक्षी, गांधीलमाश्या, मुंग्या आणि भुंगे, गाईम्हशीं गोठ्याबाहेर येण्याची वाट पाहताहेत
अंगात ताप असतांना आंघोळ करता येईल..पण ताप किती व कोणत्या कारणाने आलेला आहे अणि अंगात ताप असतानाची तब्येतीची स्थितीं काय या गोष्टींचा विचार करून आंघोळ करावी की नाही हे ठरवावे.
माणसाला गोचीड ताप आल्यावर त्या रुग्णाला ताप ही शरीराने (रोग प्रतिकारशक्तीने) विषाणू संसर्गाला दिलेली प्रतिक्रिया असते. कमी ताप असल्यास कोमट पाण्याने (पाण्याचे तापमान 27 ते 32 अंश सेल्सियस) आंघोळ केल्यास शरीर ताजेतवाने होऊन थोड बरे वाटते. अंगात ताप असताना जास्त गरम अथवा थंड पाण्याने आंघोळ करणे टाळावे. जास्त थंड पाण्याने आंघोळ केल्यास हुडहुडी भरेल व शरीराला पुन्हा तापमान वाढविण्यासाठी मेहनत करावी लागेल. तापामुळे शरीर कमजोर झाले असेल, थकवा जाणवत असेल, उलटी मळमळ होत असेल, चक्कर येत असेल तर अश्या परिस्थितीत आंघोळ करणे टाळावे. शरीराला झालेल्या एखाद्या जखमे मुळे जर ताप आला असेल तर अश्या परिस्थितीत आंघोळ करू नये किंवा आंघोळ करताना जखमे ला पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी.
आंघोळ करणे शक्य नसल्यास कोमट पाण्यात डेटोल व थोडे मीठ अणि लिंबाचा रस टाकून त्यात स्वच्छ कापड बुडवून त्याने शरीर पुसून काढावे..
गोचीड हा जेवढा जनावरांसाठी घातक आहे. तसाच तो लोकवस्ती साठी सुध्दा घातक आहे. म्हणून घराजवळ जनावरांचा गोठा बांधू नका. असेलतर त्यासाठी आदर्श गोठा पद्धतीचा स्वच्छ असा गोठा या तत्वावर बांधला जावा. लोकवस्ती मध्ये असणारे जनावरांचे गोठे याबाबत ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांच्याकडे त्याची स्वच्छता सर्वेक्षण झाले आहे याची माहिती आहे कां. गोठयातून निघणारे घाण अस्वच्छ पाणी सार्वजनिक गटार मध्ये सोडलं जातं कां.?? त्यातून निघणारा उग्र वास त्या पाण्यात होणारें जंतू. यामुळे लोकांना होणारें विविध साथीचे रोग यासाठी जबाबदार कोण ??
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा 2013 रक्षक समिती सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
9890825859

प्रतिक्रिया व्यक्त करा