कणकवली :
1 सप्टेंबर 2022 भारत भ्रमण पायी चालत प्रवास करण्याचा निर्णय मूळचा पुणे हडपसर चा 26 वर्षीय युवक आदित्य शाहू सध्या राहणार बांद्रा मुंबई उत्तरांचल मधील हरिद्वार शहरातून निघालेला आदित्य भारतीय संस्कृतीचे जतन संवर्धन प्रचार आणि प्रसार या एकाच ध्येयातून झपाटलेला महाराष्ट्रीयन तरुण गोवा मार्गे ओसरगाव मध्ये दाखल होताच. ओसरगाव चे माजी उपसरपंच चंद्रहास उर्फ बबली राणे यांनी आपुलकीने त्याची चौकशी करत संपूर्ण प्रवासाची माहिती घेतली. त्याला पोटभर जेवण व आर्थिक मदत केली व त्यांचा गावाच्या वतीने शब्द सुमनाने ओसरगाव तलाव पर्यटन स्थळ येथे त्याचा सत्कार केला.
आतापर्यंत त्यांनी अकरा राज्यातून प्रवास करत आपल्या आगळ्यावेगळ्या धाडसाचे जिद्दीचे आपलं पूर्ण परिवाराच्या लांब राहून भारत भ्रमण करायला निघाला. पूर्णपणे त्याच्या प्रवासात सर्व राज्यातील लोकांनी त्यांना आपापल्या परीने सहकार्य केले. त्याचा एकच उद्देश होता भारतीय संस्कृतीचं जवळून अनुभव घेणे व महत्त्व पटवून देणे. त्याच्या या पायी भारत भ्रमण प्रवासाला गावाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी त्याने ओसरगाव तलाव पर्यटन स्थळाचे कौतुकही केले व शासनाला आवाहन केले. भरघोस निधी देण्याची आपल्या यूट्यूब च्या माध्यमातून विनंती केली.