आंगणेवाडी येथील विक्री प्रदर्शनाचे उत्साहात उद्घाटन…
मालवण
बचत गट व्यवसायाच्या माध्यमातून महिलांच्या दरडोई उत्पन्नात वाढ होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन भाजपचे नेते तथा आमदार नितेश राणे यांनी आज येथे दिले. आंगणेवाडी येथील बचत गटाच्या उत्पादित मालाच्या प्रदर्शन व विक्री उपक्रमाचे राणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यश अतुल काळसेकर, जिल्हा प्रबंधक नाबार्ड अजय थुटे, सरपंच माधवी पालव, बँक संचालक आत्माराम ओटवणेकर, विठ्ठल देसाई, नीता राणे, समिर सावंत, व्हिक्टर डान्टस प्रकाश बोडस, जिल्हा बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, रणजीत देसाई, मनोज रावराणे, संदिप सावंत, प्रभाकर सावंत, बँक अधिकारी देवानंद लोकेगांवकर, पी.डी. सामंत, किशोर गोवेकर, पूर्णानंद सरमळकर, एकनाथ तावडे,सुरज गवंडी, दिपक वारंग, मंदार चव्हाण, स्वप्नील केळुस्कर आदि मान्यवर उपस्थित होते.
या शुभारंभ सोहळ्यास मोठ्या संख्येने ग्रामस्थ यात्रेस आलेले भाविक व जिल्हा बँकेचे शाखा व्यवस्थापक, तालुक्यातील विकास अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलतांना दळवी यांनी सांगितले मागील वर्षी ८५लाखाची उलाढाल प्रदर्शनाच्या माध्यमातून झाली. हा टप्पा यावर्षी ओलांडला जाईल. महिलांसाठी जिल्हा बँकेने नविन धोरण आखले आहे. मागील वर्षी ८ कोटीची कर्जे महीलांना वितरीत करण्यात आली. यावर्षी मार्च महिन्यात महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम,योजना राबविण्यात येणार आहेत.बचत गटा मार्फत महिलांचे उद्योग उभे राहीले पाहिजेत. यासाठी जिल्हा बँकेने स्वतंत्र महिला कक्ष स्थापन केला आहे. जिल्ह्यातील महिलांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतील.जिल्हा बँक महिलांच्या पाठिशी सदैव उभी राहील.जेव्हा तुमच्या मनात येईल शेती उद्योग, प्रक्रिय उद्योग करावयाचा आहे.या प्रत्येक बाबतीत जिल्हा बँक तुमच्या सोबत उभी राहील,अशी मी ग्वाही देतो, असे प्रतिपादन मनिष दळवी यांनी यावेळी केले.
जिल्हा बचत गटाचे स्टॉलला अनेक मान्यवर पत्रकार यांनी भेट देऊन उपस्थित महिलांचे मनोबल उंचावले व समाधान व्यक्त केले. जिल्ह्यातील सुमारे १०२ महिला बचत गटांनी प्रदर्शन सोहळ्यास सहभाग नोंदवला असून महिला बचत गटांकडील माल खरेदी साठी ग्राहकांनी व मुंबईकर चाकरमान्यानी पहिल्या दिवसापसुन गटांच्या स्टॉलवर गर्दी केली आहे. बचत गटांच्या उत्पादित मालाचे प्रदर्शन व विक्री कालावधी ०३ ते ०५ फेब्रुवारी २०२३ असा आहे.