सावंतवाडी
क्षितिज गुडगाव, दिल्ली संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या 24 व्या आंतरराष्ट्रीय चाइल्ड आर्ट प्रदर्शन 2022 या स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चित्रकला, कार्टून बनवणे, शुभेच्छापत्र बनवणे, फोटोग्राफी या विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश प्राप्त केले.
विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी ही स्पर्धा प्रेरणादायक ठरली.
या स्पर्धेत कु. श्री कोरगावकर , कु .ॲरन पिंटो व कु. नुवैरा सय्यद यांनी सुवर्णपदक तर कु. प्रार्थना नाईक हिने रजत पदक प्राप्त केले.
सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेच्या कला शिक्षिका कुमारी विनायकी जबडे व सौ. सुषमा पालव यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेच्या कलाशिक्षिका सौ. सुषमा पालव यांनी क्षितिज आयोजित चौदाव्या राष्ट्रीय कला प्रदर्शनात सुवर्णपदक प्राप्त केले. शाळेच्या कलाशिक्षिका व मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत यांना विद्यार्थ्यांना कलाशिक्षणाप्रती उत्तेजन दिल्याबद्दल ‘क्षितिज प्रतिक’ पुरस्काराने गौरविण्यात आले तर स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात आली.
त्यांच्या या यशाबद्दल शाळेचे संस्थापक श्री. रुजुल पाटणकर व अन्य सहकाऱ्यांनी सर्वांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.