You are currently viewing सासु (विडंबन) काव्य

सासु (विडंबन) काव्य

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

 *सासु (विडंबन )*काव्य*

 

किती सांगु बाई

माझ्या सासूबाई

नटण्याची त्यांना सदा

असते खुपच घाई

 

सकाळी मला सांगतात

करून घे देवपुजा

स्वतः मात्र सायंकाळी

पार्टीत घेतात मजा

 

मॅचिंग ब्लॉऊस साडी

पदर नीट नेटका

मामंजीशी रोज असतो

पडला त्यांचा खटका

 

सिरीयल मध्ये सासूच्या

असतात खूप दंग

शॉपिंग सिनेमा नाटकांचा

खूपच त्यांना छंद

 

ब्युटीपार्लरची भेट

आठवड्यातून एकदा

ब्लिच फेशियल करून

आरसा न्याहाळता दहादा

 

मामंजीना असतो बाई

त्यांचा फारच धाक

अगदी फावल्या वेळी दोघे

खेळतात सारीपाट

 

करता स्वयंपाक मी

चुका काढतात खूप

नसता लक्ष माझे

चोरून पीतात सूप

 

आमच्या वेळी असं

ऐकुन आला वीट

नणंद बाईंचं कौतुक

ऐकुन घ्यायचं नीट

 

बीपी.शुगरची गोळी

विसरतात सकाळी

बोल बोलतात मला

आठव येता संध्याकाळी

 

*शीला पाटील. चांदवड*.

प्रतिक्रिया व्यक्त करा