आ.वैभव नाईक यांनी नियुक्ती जाहीर करत केले अभिनंदन
माजी पंचायत समिती सदस्य आणि शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते कमलाकर गावडे यांची शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पेंडुर जिल्हा परिषद विभागप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी त्यांची नियुक्ती जाहीर करत त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी,उप तालुकाप्रमुख गणेश कुडाळकर,शहरप्रमुख बाबी जोगी, युवासेना समन्वयक मंदार ओरसकर, सन्मेश परब, पंकज सादये, तपस्वी मयेकर, नरेश हुले, अक्षय रेवंडकर, करण खडपे, उमेश चव्हाण,फारुक मुकादम, राजा इब्रामपूरकर अक्षय भोसले,राजू मेस्त्री,सिद्धेश मांजरेकर आदी उपस्थित होते.