*भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे लिखित लेख*
*लगीन बाजार*
सात जन्माच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात आणि त्याप्रमाणे प्रत्येक धर्मात लग्न हा एक धार्मिक व सामाजिक मान्यतेनुसार आपल्या व आपल्या जोडीदार पाहणे एकामेकाला पसंत करणे आणि मग लग्न करून आपणांस एकत्र राहणे. कुटुंबाला वारस देणे हे शक्य आहे.
गतकाळात आई वडील मुलगी पसंत करत होते आणि मुल मुलगी आई वडील व वडिलधाऱ्या लोकाचा माण ठेवून गप्प गुमान लग्नाला तयार होत. आज प्रस्थिती बदलली आणि पूर्वीच्या काळात मुलीला चूल आणि मूल एवढ्या पुरते मर्यादित राहावे लागत असे. महात्मा ज्योतिबा फुले. छत्रपती शाहू महाराज. व फातिमा शेख. सावित्रीबाई फुले यांनी मुलीच्या शिक्षणावर भर दिला आणि चूल आणि मूल पर्यंत मर्यादित असणारी आपली मुलगी बहिण यांना शिक्षणाचा अधिकार प्रदान केला. आणि मुलगी शिक्षण घेण्यास सुरुवात झाली आणि सरकारने विविध शैक्षणिक योजना कोर्स सुरू केले. मुलींना महिलांना 50/टक्के आरक्षण अशी तरतूद केली त्यामुळे शिक्षण घेणाऱ्या मुलींना नोकरी व विविध ठिकाणी योग्य ते आरक्षण ठेवण्यात आले त्यामुळे महिला मुली सबल झाल्या मोबाईल फोन ट्विटर फेसबुक ई-मेल यामुळे गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये घडणारया सर्व घटनाची माहिती मुलींना आली आणि मुलींना शिक्षण पूर्ण करण्यासाठी आज सर्वसामान्य अंदाज केला असता 27ते 28 वर्ष शिक्षण आणि नोकरी पाहण्यात जातात त्यामुळे लग्नाचं वय निघून जाते.
आणि त्यातून लग्न जमलं तर मुलीची मुलांच्या बद्दल शासकीय नोकरी पाहिजे. घरात आई वडील नको. फक्त आपण दोघेच बंगला गाडी नोकरी घरात नोकर अशी मानसिकता तयार आज झाली आहे. त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती लोप पावली आहे. आई वडील भाऊ बहीण यांचीही भेट होणे आज शक्य नाही कारणं मुलीच्या अपेक्षा वाढल्या मुलगी पाहणे ही एक आपल्या धर्मात परंपरा आहे पूर्वी स्वयंवर माध्यमातून मुलगी आपल्या जीवनसाथीची निवड करत होती पण आज स्वयंवर करायला मुल कुठ तशी आहेत व्यसनी. तंबाखू गांजा अफू चरस दारु अशी व्यसनी लागून आजची पिढी बरबाद झाली आहे मुलगी पाहावयास गेल की मुलीला विविध प्रश्न विचारले जातात. स्वयंपाक येतो का * साफ सफाई करता येते का * गाण येत कां * देवपूजा येते का * आणि त्या मुलीला व्यवस्थित चालला बोलता येत कां * आजतर नवीन प्रथा आहे मुला मुलींची एच आय व्हि टेस्ट करण्याचा फंडा आहे. * अशी सर्व विचारणा केली जाते पण हेच प्रश्न कोणी मुलाला विचारत नाही * आजकाल बदलला आणि मुलांना असे प्रश्न विचारण्याचा अधिकार मुलींना आहे घरात कोण कोण आहे *. घर आहे का * नोकरी आहे का* पगार किती आहे त्यात दोघांचं भागेल का * मुलांची आवड आहे का * बाहेर फिरायला खायल घेवून जाणे जमलं का * असे प्रश्न आज मुली सुद्धा विचारत आहेत लग्नाच्या वयात आलेल्या मुलांचे अवघड झाले व्यसनी मुलांना आज मुली मिळत आहेत कारण त्यांच्यामागे असणारी संपत्ती बघून. पण खरोखरच कष्ट करणारे चहा गाडी. वडापाव शेतकरी गॅरेज एम आय डी सी. अशा विविध ठिकाणी काम करणारी बिगर व्यसनी मुल प्रामाणिक पणे आपली व आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडणारी मुल यांना मुलगी देताना मुलीचे आई-वडील दहा वेळा विचार करतात काय वाईट आहे बघा. काही मुली सुद्धा चुकीच्या मार्गाने जातात बाहेरील जातींतील मुलांसोबत पळून जाणे. जाताना घरातील पैसा दागिने घेवून जाणे. आई वडील यांच्यापासून मुलाला दूर करणे. घरात सदैव भांडत असणे. सासरच्या लोकांवर घरेलु हिंसाचार शारीरिक व मानसिक त्रास देणे असे खोटे गुन्हे दाखल करणे असे सासरच्या गरिब लोकांना त्रास दिला जातोो. म्हणजे मराठी भाषेत एक म्हण आहे *एका हाताने टाळी वाजत नाही * कोणालाही नाव ठेवण्याचा मला अधिकार नाही
आज वरिल प्रस्थिती ध्यानात घेता मुलांचे वय नोकरी यांची वाट पाहणे. भरती नाही. सरकारने भरतीसाठी वाढवलेली वयाची मर्यादा यांमुळे लग्नाची वय मुलांची मुलींची निघून गेली सर्वात मोठे संकट आज मुला मुलींच्या आई वडील यांच्यासमोर आहे कारण बिगर नोकरी कोण मुलगी देत नाही. नोकरी याची वाट बघावी तर वय निघून जात आहे. अशी पालकांच्या मनाला घोर लागला आहे आज सर्व पालक यामुळे गळतील लागलें आहेत आणि त्यातून लग्न ठरलं तर मागणी वरदक्षणा म्हणून आर्थिक मागणी. कपडे लतते सोन दागिने. येणे जाणे. जेवन कस असाव. येणारे पाहुणे यांचा आदर सत्कार कसा असावा.
आज आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये सर्वत्र ठिकाणी एक वेगळा व्यवसाय सुरू झाला आहे तो म्हणजे * वधू-वर सूचक केंद्र * जागोजागी विविध समाजांचे अथवा सर्व समाजातील मुला मुलींच्या जीवनसाथी निवडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ अशी जाहिरात केली जाते जीवनसाथी. * सप्तपदी * रेशीमगाठी * भाग्यवान * स्वप्नातील राजकुमार * सखी सहेली * अशा विविध नावांनी रोज एक वधू-वर सूचक केंद्र सुरू होत आहे त्याबरोबरच त्यांचे दरपत्रक ठरलेले आहे त्यानुसार. लग्न जमविण्यासाठी 10.000 पासून 1 लाख रूपये अशी उकळणी केली जाते. मुलगी पाहण्यासाठी जाण्यासाठी लागणारा खर्च जेवन खाण हे सर्व खर्च संबंधित व्यक्तिने करावा लागेल. लग्न ठरल्यावर पेहरावा घयावा लागेल. आगोदर पन्नास टक्के फी द्यावी लागेल. अश्या विविध अटी शर्ती नुसार हा सर्व बाजार भरत असतो
आपणं रोज वृतमानपत्रात वाचतो. दुरध्वनी. दुरदरशन. यामध्ये वाचतो पाहतो की आज अमुक गावांत वधू-वर सूचक केंद्र यांच्याकडे अशा काही विविध काम नसणार या. बेरोजगार. सुंदर मुली असतात त्यातील काही मुली लग्नासाठी गडबड ज्या मुलांचे आई-वडील करत असतील त्यांना बोगस मुली. बोगस घर. बोगस नोकरी. बोगस मुलींचे आई वडील. असे सर्व नियोजन करून. मुलांना फसविलयाचे षडयंत्र रचले जाते. त्यात प्रामुख्याने वधू-वर सूचक हे सर्वात घातक व्हायरस याचे कारण आहे. आज आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये काम करणारे असे वधू-वर सूचक केंद्र कोणत्याही ठिकाणी नोंदित नाहीत. पोलिस स्टेशनला तक्रार करू शकत नाही. वधू-वर सूचक केंद्र चालक यांचें त्यात क्षेत्रातील गुंड गुन्हेगार. राजकारणी लोक यांच्याशी घनिष्ठ संबंध असतात. त्यामुळे यांच्याविरोधात कोणीही जात नाही. रासरोस पणे आर्थिक लुट करण्याचा आणि कमी वेळात जास्त पैसा मिळविण्याच्या मार्ग म्हणजे वधू-वर सूचक केंद्र होय. आपणं म्हणतो सात जन्माची गाठ स्वर्गातच बांधली जाते मग आज आपला जीवनसाथी निवडण्यासाठी पैसै का मोजावे लागत आहेत. आपणच अशा विविध अवैध धंद्याला वाव देत असतो आपण देतो म्हणून ते घेतात. आजच आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये असणारे आपल्यासमोर चालणारे वधू-वर सूचक केंद्र याची माहिती नजिकच्या पोलिस स्टेशनला द्या आणि त्यांची सत्यता पडताळून पहा.
हिन्दू विवाह भोगाचे साधन नाही, एक धार्मिक-संस्कार आहे. संस्काराने अंतःशुद्धी होते आणि शुद्ध अंतःकरणाने दांपत्य जीवन आनंदात पार पडतं
1.ब्रह्म विवाह : दोन्ही पक्षांच्या
संमतीने समान वर्गाच्या सुयोग्य वरासोबत कन्येच्या इच्छेनुसार विवाह निश्चित करणे याला ‘ब्रह्म विवाह’ असे म्हणतात. या विवाहात वैदिक रीती आणि नियम पाळले जातात. हे उत्तम विवाह आहे.
2.देव विवाह : एखाद्या धार्मिक कार्य या उद्देश्याने किंवा मूल्य रूपात आपली कन्या एखाद्या विशेष वराला सोपवणे याला ‘देव विवाह’ असे म्हणतात. परंतू या विवाहात कन्येच्या इच्छेकडे दुर्लक्ष केलं जातं. हा मध्यम विवाह आहे.
3.आर्श विवाह : कन्या-पक्षाला कन्येचे मूल्य चुकवून (सामान्यतः गो दान करून) कन्येशी विवाह करणे याला ‘अर्श विवाह’ असे म्हणतात. हा मध्यम विवाह आहे
4.प्रजापत्य विवाह : कन्येची संमती घेतल्याविना पालकाद्वारे तिचा विवाह अभिजात्य वर्गाच्या (धनवान आणि प्रतिष्ठित) वरासोबत करणे याला ‘प्रजापत्य विवाह’ असे म्हणतात.
5.गंधर्व विवाह : या विवाहाचे वर्तमान स्वरूप म्हणजे प्रेम विवाह. कुटुंबाच्या समंतीविना वर आणि कन्या यांच्याद्वारे विधीशिवाय आपसात विवाह करणे याला ‘गंधर्व विवाह’ असे म्हणतात. वर्तमानात हे केवळ यौन आकर्षण आणि धन तृप्ती या हेतूने केलं जातं आणि याला प्रेम विवाह असे नाव दिलं जातं.
6. असुर विवाह : कन्येला खरेदी करून (आर्थिक रूपाने) विवाह करणे याला ‘असुर विवाह’ असे म्हणतात
7.राक्षस विवाह : कन्येच्या संमतीविना तिचे अपहरण करून बळजबरी विवाह करणे याला ‘राक्षस विवाह’ असे म्हणतात.
8.पैशाच विवाह : गुंगीत असलेल्या कन्येचा (गहन निद्रा, मानसिक कमजोरी इत्यादी) लाभ घेत तिच्याशी शारीरिक संबंध स्थापित करणे आणि तिच्यासोबत विवाह करणे याला ‘पैशाच विवाह’ असे म्हणतात.
या आठ प्रकारांच्या विवाहातून केवळ ब्रह्म विवाहाला मान्यता आहे बाकीचे विवाह धर्म संमत मानले गेले नाही. तरी पण यातून देव विवाहाला प्राचीन काळात मान्यता प्राप्त होती.
आज लग्न किंवा वधू-वर सूचक केंद्र यांना सहकार्य करणारे ब्राम्हण सुध्दा आहेत लग्नात आपल्या धर्मानुसार कुंडली काढणे व ती जुळविणे. गण गोत्र. वंशावळ. असे सर्व मुद्दे महत्वाचे माणले गेले आहेत त्यानुसार या सर्वांची माहिती ब्राम्हण लोकांना वेध पाठक. कुंडली शात्र गृहतारे. यांचे ज्ञान ब्राम्हण लोकाना असते असे समजलें जाते. एखाद्याची कुंडली जुळत नसेल तर ठराविक आर्थिक लाभ ब्राम्हण लोकांना दिला की कुंडली जुळते. कालसर्प योग. मंगलदोष. शनि प्रकोप. आपोआप कमी केला जातो किंवा करण्यासाठी पैसे घेऊन ही कमी करण्याची ताकद ब्राम्हण लोकात असते. लग्न लावण्यासाठी ठराविक फी. आकारली जाते. अशा लग्न विधी पार पाडणारे यांची सुध्दा संघटना आहे का ?
जगाचा नियम आहे की कोणासाठी कोणीतरी जगात आहे मी आजच्या सर्व तरुण मुलांना आणि तरूण मुलींना कळवळीची विनंती आहे की आपला जीवनसाथी निवडताना तो शारीरिक दृष्ट्या सदृढ असवा. घर आई वडील भाऊ बहीण असे एकत्र कुटुंबात राहणारा असावा. तो कोणतेही व्यसन करणारा नसावा. कमवून खाणारा प्रामाणिक पणे आपले व आपल्या कुटुंबांचे पालनपोषण करणारा असावा. बोलन स्वभाव मायाळू असावा. मुली मुलांच्या आई वडील यांनी आपल्या आर्थिक अशा माग ठेवा. विधवा लग्नाला आत्ता शासनाने सुध्दा परवानगी दिली आहे. सोडचिठ्ठी होणारी तरूण मुलं मुली यांना सुध्दा पुनर्विवाह करण्यास परवानगी आहे. व अनेक कारणांमुळे ज्यांचे वैवाहिक जीवन विस्कळीत झाले आहे. त्यांच्यासाठी सुध्दा लग्न करणयाचा नियम आहे. पण अशी काही प्रकरणे वधू-वर सूचक केंद्र यांचें उकळ पांढरे करणारी असतात कारण यांच लग्न जमतं नाही कोण मुलगी देत नाही. कोणाला मुलगा मिळत नाही यामुळे अशी सर्व तरूण मुलं मुली व त्यांचे पालक वधू-वर सूचक केंद्र यांना मागील तेवढी फी देण्यास तयार असतात.अशामुळे भ्रष्ट कारभार जोरात चालतो
ज्या खानदानात मुलगी सुंदर असेल पण त्या मुलींचे चालचलन ठिक नसेल तर ती मुलगी केल्यास आपला अपमानास्पद वागणूक मिळेल. त्यापेक्षा झोपडपट्टीत राहणाऱी मुलगी रंग चेहरेपट्टी याने थोडी कुरुप असेल आणि तिचे राहणीमान चालचलन व्यवस्थित असेल चालणे बोलणें स्वभाव प्रेमळ असेलतर अशी मुलगी केल्यासा आपल्या खानदानाचे नाव उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे जाणकार लोकांच्या मतानुसार कमळ हे चिखलातच जन्म घेत असते.
आजच विचार करा आणि निर्णय घ्या.
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९