You are currently viewing विधवेचा सन्मान !

विधवेचा सन्मान !

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*विधवेचा सन्मान !*

 

कालपरवाच नाण्याएवढं तिच कूंकू

समाजानं पुसायला लावलं

अचानक कपाळ भकास मोकळ

बांगड्या हातातील!काढाव लागलं ..!

 

शृंखला घातल्या वेळोवेळी

दुःख सोसायलाही वेळ नाही

विधवेचा आत्मसन्मान रोखला

आसवांना ढाळायला वेळ उरला नाही.!

 

गुंफलेले हात अकस्मात सुटले

नशिबाने सौभाग्यावर घाव घातला

जगण्याचा भार व्हावा इतका !की

सारा डाव मोडीत निघाला ..!

 

कुप्रथा विधवांच्या मोडीत काढाया

तिने निश्चयाने! पाऊल पुढे टाकले

विरोध कराया जवळचेच सरसावले

पण तिने छोटेसे कुंकू!कपाळी लावले.!

 

तिने कुणाची पर्वा केली नाही

समाजाच्या कुप्रथेला गाडून टाकलं

लागली जरी तिच्या आनंदाला ठेच

तिच्या पोरांच्या चेह-यावर हसू आलं..!!

 

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा