You are currently viewing हुमरमळा गावांमध्ये पन्नास लाख रुपयांच्या पाणी योजनांचा अर्चना बंगे यांच्या हस्ते शुभारंभ…

हुमरमळा गावांमध्ये पन्नास लाख रुपयांच्या पाणी योजनांचा अर्चना बंगे यांच्या हस्ते शुभारंभ…

करमळीवाडी पेडणेकर, समर्थ नगर, पडोसवाडी गुंजकर वाडी, परकरवाडी मुख्य रस्ता लगत वाडयांचा समावेश…!

कुडाळ

हुमरमळा (वालावल) गावातील विकास कामांसाठी खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून निधी प्राप्त होत असताना पाणि योजना पुर्ण करुन ग्रामस्थांच्या पाण्याची गैरसोय दुर होण्यासाठी अर्चना बंगे यांच्या पाठपुराव्यामुळे पन्नास लाख रुपयांच्या निधिंच्या कामांचा शुभारंभ आज सरपंच सौ अर्चना बंगे, उपसरपंच स्नेहल सामंत, जेष्ठ ग्रामस्थ प्रभु, ग्रामपंचायत सदस्या रमा गाळवणकर यांच्या शुभ हस्ते नुकताच संपन्न झाला.

हुमरमळा (वालावल) गावांच्या विकास म्हणजे जिल्ह्यातील माॅडेल समजला जातो अतुल बंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच सौ अर्चना बंगे, उपसरपंच स्नेहल सामंत यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीने मागिल वर्षात चांगली विकास कामे करुन ग्रामस्थांच्या मना मध्ये आपुलकीची भावना निर्माण केली आहे, अनेक विकासकामांबरोबर आज पडोसवाडी गुंजकरवाडी, करमळीवाडी पेडणेकर वाडी, समर्थ नगर, परकरवाडी रस्त्यालगत या कामांचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, ग्रामपंचायत सदस्या रमा गाळवणकर, ग्रामपंचायत सदस्या सौ गिरीजा गुंजकर, युवासेना शाखा प्रमुख संदेश जाधव, युवासेनेचे मितेश वालावलकर, सतिश मांजरेकर, भिवा गुंजकर, भाऊ गुंजकर, ग्रामपंचायत सदस्य कांता माड्ये, दत्ता गुंजकर, पांडुरंग गुंजकर बबन हळदणकर, बाबल हळदणकर, उदय खडपकर, अजित केसरकर, सचिन पेडणेकर, परशुराम गुंजकर, पांडुरंग गुंजकर, प्रभु सतिश मांजरेकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा