You are currently viewing हस्तकलांमधून विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी – चंद्रशेखर सिंग

हस्तकलांमधून विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी – चंद्रशेखर सिंग

एसपीकेत दोन दिवशीय हस्तकला प्रदर्शन; सावंतवाडी राजघराण्याला हस्तकलेचा वारसा

सावंतवाडी

सिंधुदुर्गात कोणती हस्तकला विकसित करायची ते ठरवणे महत्त्वाचे आहे. 365 हस्तकला असून जिल्ह्यात सावंतवाडीची लाकडी खेळणी ही कला खुप प्रसिद्ध आहे. विविध हस्तकलांमधून विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. विद्यार्थी कलेकडे कसे वळतील यासाठी शासनाकडून बरेच प्रयत्न सुरू आहेत. कला असलेल्या विद्यार्थ्यांनी पुढे यावे, संधी जाणून घेत कोकणात नव्याने रोजगार सुरू करावा, असे आवाहन वस्त्रोद्योग मंत्रालय सहा. संचालक चंद्रशेखर सिंग यांनी पत्रकार परिषदेत केले.

एसपीकेत दोन दिवशीय हस्तकला पदग्रहण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सावंतवाडी राजवाड्यातील राणी साहेब शुभदा देवी भोसले, देवरुख कॉलेजचे प्राचार्य रणजित मराठे आदी मान्यवर उपस्थित होते.

चंद्रशेखर सिंग पुढे म्हणाले की, सावंतवाडी राजघराण्याला हस्तकलेचा वारसा आहे. विद्यार्थ्यांना कलेची माहिती व्हावी म्हणून राजवाड्यात हस्तकला प्रदर्शन भरवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच हस्तकला संदर्भात सर्व माहिती दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा