You are currently viewing जागतिक महिला दिनानिमित्त विचार जागर फाउंडेशन तर्फे महिलांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन

जागतिक महिला दिनानिमित्त विचार जागर फाउंडेशन तर्फे महिलांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन

*जागतिक महिला दिनानिमित्त* *विचार जागर फाउंडेशन* तर्फे महिलांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन.

8 मार्च *जागतिक महिला दिनानिमित्त* *विचार जागर फाउंडेशन* तर्फे *महिलांचा आत्मसन्मान* या विषयावर केवळ महिलांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर स्पर्धेत सहभागींना मोफत प्रवेश असेल. विजेत्या महिलांना *प्रथम क्रमांकाचे बक्षीस* *3,000/-* (तीन हजार), *द्वितीय क्रमांकाचे बक्षीस* *2,000/-* (दोन हजार), आणि *तृतिय क्रमांकाचे बक्षीस* *1,000/-* (एक हजार), तसेच उत्तेजनार्थ बक्षिसे (25 जणांना प्रमाणपत्र) देण्यात येतील.

स्पर्धकांनी स्वलिखित निबंध 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत पोहोचेल अशा बेताने सचिव, विचार जागर फाउंडेशन, शॉप क्र. 7, जसवंती अपार्टमेंट, अंबड लिंक रोड, पवन नगर, नाशिक – 422 009 या पत्त्यावर पाठवावा.

स्पर्धेचा निकाल 01 मार्च, 2023 रोजी घोषित केला जाईल तसेच *बक्षीस वितरण समारंभ 8 मार्च, 2023* रोजी कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय, सिंहस्थनगर, सिडको, नाशिक येथे आयोजित केला जाईल. तरी, महिलांनी सदर निबंध लेखन स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवावा असे आवाहन स्पर्धेचे समन्वयक श्रीमती. लता कांबळे, मनिषा कापुरे, करुणा वाडेकर, स्वप्ना थोरात यांनी केले आहे.

1. *निबंध लेखन स्पर्धेच्या नियम व अटी*
2. निबंध मराठी भाषेत सुवाच्च अक्षरात लिहिलेला असावा.
3. निबंधाच्या पहिल्या पृष्ठावर स्वतःचे पूर्ण नाव, पत्ता, पिनकोड लिहावा.
4. निबंध किमान 1000 शब्दांत असावा.
5. कॉपी केलेल्या निबंधाचा विचार केला जाणार नाही.
6. *विचार जागर फाउंडेशन* चा निर्णय अंतिम असेल.

अधिक माहितीसाठी संपर्क : स्पर्धा समन्वयक
श्रीमती. लता कांबळे – +91 96573 49797
श्रीमती मनिषा कापुरे – +91 82086 54007
श्रीमती स्वप्ना थोरात – +91 75886 44084
श्रीमती करुणा वाडेकर – +91 98600 08270

प्रतिक्रिया व्यक्त करा