You are currently viewing टॉवर प्रीमियर लीग ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेत राजेश इलेव्हन संघाने चुरशीच्या लढतीत अंतिम जेतेपद पटकावले

टॉवर प्रीमियर लीग ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेत राजेश इलेव्हन संघाने चुरशीच्या लढतीत अंतिम जेतेपद पटकावले

*टॉवर प्रीमियर लीग ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेत राजेश इलेव्हन संघाने चुरशीच्या लढतीत अंतिम जेतेपद पटकावले*

*मॅन ऑफ द मॅच राजेश*

मुंबई,
प्रमोद कांदळगावकर

भांडुपच्या *टॉवर प्रीमियर लीग* संघाने ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक २९ जानेवारी २०२३ सकाळी ८:०० वाजता साईनाथ मैदान ऐरोली ठाणे येथे केले होते. या चुरशीच्या खेळल्या गेलेल्या ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीच्या लढतीत राजेश इलेव्हन संघाने *यश्र्वि इलेव्हन* संघाला पराभूत करून अंतिम विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा मान राहुल शिंदेने पटकाविला.
टॉवर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत भांडुप मधील नामांकित खेळाडूंनी आपल्या चांगल्या खेळाचे छानदार प्रदर्शन केले. तब्बल १२० खेळाडूंनी ह्या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. सुरुवातीला मर्यादित चार षटकांची ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा असल्यामुळे अनेक नामांकित खेळाडूंचे या ठिकाणी आपलं कसब व कौशल्य पाहायला मिळाले.


मात्र, अंतिम फेरीचा सामना हा संयोजकांनी दोन षटकांचा खेळविण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेत अंतिम विजयी राजेश इलेव्हन संघाने 2 षटकात 28 धावा केल्या.
तर उपविजयी यशस्वी इलेव्हन संघाने एकूण फक्त 11 धावा केल्या.
संपूर्ण स्पर्धेतील अंतिम विजयी राजेश इलेव्हन संघाला ३३,३३३ व आकर्षक करंडक तर उपविजेत्यां यशस्वी इलेव्हन संघाला २२,२२२ रूपये व आकर्षक करंडक देऊन सन्मानित करण्यात आले.
उत्कृष्ट फलंदाज, निलेश महाडिक उत्कृष्ट गोलंदाज मोहन तर मॅच ऑफ दी मॅच राजेश ठरला. स्पर्धेतील खेळाडूंना आकर्षक सन्मानचिन्ह मेडल तसेच इतर पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत भांडुप मधील नामवंत ८ संघांचाच प्रवेश निश्चित करण्यात आला होता. राजस्वप्न या संघाचे मालक
स्वप्निल भास्कर तावडे होते. तर
साई राम संघाचे मालक आनंद सतावसे, यशस्वी ११ संघाचे मालक प्रशांत घाडी, माळी ११- संघाचे मालक ऋषिकेश पेडणेकर तर कॅडबरी संघाचे मालक अनिकेत सकपाळ होते. ऑल स्टार ११ चे मालक संदीप परब, राजेश ११ चे मालक राजेश आणि अमोल ११ चे मालक अमोल बोभाटे होते.
या संपूर्ण स्पर्धेचे उत्कृष्ट असे आयोजन टॉवर प्रीमियर लीग कमिटीने केले आहे. कमिटी सदस्य म्हणून आयोजन कमिटी मध्ये अक्षय शिरसाट, संदीप परब, रोहित ब्रम्हादंडे ,निखिल पितळेकर,अनिकेत सकपाळ,अनुराग विशवेकर, दिपेश घाडी आणि आनंद सातावसे यांचा समावेश होता.
एकूण १२० खेळांडूमधून ८ संघांनी एकूण ९६ खेळाडूंना लिलावात खरेदी केले होते. “न भूतो न भविष्यती” अशी ही क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली. सदर स्पर्धेचे सूत्र संचालन तेजस सदडेकर आणि अमित कांडरकर यांनी केले. तसेच पंच म्हणून विश्वजीत आणि किरण आपली कामगिरी चोख बजावली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा सीता दीदी मुखिया ,कौस्तुभ थापा ,समाजसेवक विठ्ठल परब, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला, राजस्वप्न संघाचे मालक स्वप्निल भास्कर तावडे यांनी माध्यमांशी बोलताना खंत व्यक्त केली की, टॉवर प्रीमियर लीग 2023 ही क्रिकेटची स्पर्धा भव्य दिव्य स्वरूपात व्हावी यासाठी गेले पाच महिने पूर्व नियोजन कमिटीने केले होते. भांडुप सारख्या विभागामध्ये क्रिकेटचे नामांकित अष्टपैलू खेळाडू आजही चांगली उत्तुंग कामगिरी करत आहेत.
मात्र,आपल्या नवोदित खेळाडूंना खेळण्यास एकही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून खेळण्यासाठी सुसज्ज मैदानच उपलब्ध नाही. हे दुर्भाग्य म्हणावं लागेल. भांडुप मधील खेळाडूं तर्फे इतकी उत्कृष्ट स्पर्धा आयोजित केली पण ही ऐरोली सारख्या ठिकाणी खेळवावी लागते, यासारखे दुर्भाग्य कोणते.? असेही स्वप्निल भास्कर तावडे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा