You are currently viewing माजगाव गरड येथील मशिदिजवळ आयशर टेम्पोचा अपघात   

माजगाव गरड येथील मशिदिजवळ आयशर टेम्पोचा अपघात  

सावंतवाडी

माजगाव गरड परिसरातील मशिदी समोरील वळणावर मालवाहक आयशर टेम्पोचा चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला. ही घटना सोमवारी पहाटे घडली.या अपघातात चालक बालंबाल बचावला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की जय मल्हार ट्रान्सपोर्टचा आयशर टेम्पो माजगाव हून सावंतवाडीच्या दिशेने जात होता. यावेळी गरड परिसरातील मशिदी जवळ आला असता समोरून येणाऱ्या भरधाव गाडीला वाचवण्याच्या प्रयत्नात टेम्पो गटारात कलंडला. या अपघातात चालक बचावला आहे. अपघाताची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा