You are currently viewing माजी सरपंच श्री. प्रभाकर सखाराम बांदल यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन…

माजी सरपंच श्री. प्रभाकर सखाराम बांदल यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन…

कणकवली

कणकवली तालुक्यातील वरवडे गावचे माजी सरपंच प्रभाकर उर्फ भाई सखाराम बांदल (वय 75, रा. हिवाळेवाडी, वरवडे) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आज सकाळी वरवडे येथील राहत्या घरी निधन झाले. प्रभाकर बांदल हे केंद्र सरकारच्या सीआरपीएफ दलातून अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झाले होते.

2018 ते 2022 दरम्यान त्यांनी वरवडे गावचे लोकनियुक्त बिनविरोध सरपंच म्हणून यशस्वी कार्यभार सांभाळला होता. आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास त्यांना छातीत दुखू लागले. डॉक्टरकडे तपासणीसाठी जायची तयारी करत असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला. त्यानंतर त्यांना वैद्यकीय उपचारासाठी नेण्यात आले.

मात्र, तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले होते. माजी पं. स. सदस्या राधिका सावंत यांचे ते वडील तसेच भाजपा कणकवली उपतालुकाध्यक्ष सोनू सावंत यांचे सासरे होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी असा परिवार आहे. अत्यंत शांत आणि मनमिळाऊ वृत्तीच्या भाई बांदल यांच्या निधनाने वरवडे गावावर शोककळा पसरली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा