संबंधित यंत्रणेच्या ग्रीन सिग्नल नंतर जुगारासाठी जागा निश्चित.
जुगाराच्या तक्षीमसाठी संबंधित यंत्रणेच्या नव्याने दाखल झालेल्या प्रमुखांकडून गुन्ह्यांचा शोध घेणाऱ्या शाखेच्या धनवानांकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर कणकवलीतील जुगाराचे बादशाह टिंगल कॉन्टेरो याने कणकवलीतील एका लॉजिंगमध्ये तक्षीम घेणाऱ्या मुख्य जुगाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली. लॉजिंगमध्ये झालेल्या कालच्या बैठकीत उद्यापासून कणकवली पासून सात किलोमीटर अंतरावर बेळणे महामार्गालगत जुगाराच्या बैठकीसाठी जागा निश्चित करण्यात आली. टिंगल कॉन्टेरो आणि फोंडयाच्या पारावरच्या विठ्ठल चे बैठकीसाठी नियोजन पक्के आहे.
कणकवलीत झालेल्या या बैठकीत झालेल्या ठरावानुसार कणकवलीतील टिंगल कॉन्टेरो, फोंडयाच्या पारावरचा विठ्ठल नाम जपणारा विठ्ठल, फोंडा घाटाखालील दात पडलेला मंतांचा आप्पा हे मुख्य बैठक मांडणार आहेत. जुगाराच्या बैठकीची मांडवली होऊन संबंधित यंत्रणेकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर काल दुपारी दीड वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व जुगाराच्या खेळाडूंना निमंत्रित करण्यात आले. मीडियाचे टेन्शन घेऊ नका, आपल्याला संबंधित यंत्रणेकडून अधिकृत सिग्नल मिळाला आहे असा मेसेज जिल्हाभरातील खेळाडूंना पोचला आहे, त्यामुळे उद्यापासून जिल्ह्यातील नामवंत खेळाडूंचा मेळा कणकवलीकडे येताना दिसणार आहे.
जुगारासाठी वडिलोपार्जित जमीन जायदाद विकून लाखोंच्या पटीत रक्कम जुगाराच्या सारिपटावर लावून नशीब आजमावणाऱ्यांची नावे देखील संवाद मिडियाकडे आली आहेत. विविध राजकीय पक्षांमध्ये बेडूक उद्या मारणारे राजकीय पक्षातील नामवंत चेहरे देखील उद्यापासून सुरू होणाऱ्या बैठकीसाठी पॅड बांधून तयार आहेत. २५०००/५००००/६०००० प्रति महिना हफ्ता कोणाला द्यायचा याची नोंद सुद्धा जुगाऱ्यांच्या अधिकृत डायरीमध्ये झाली आहे. अधिकृत परवानगी मिळाल्याने बेळणे जवळ होणाऱ्या या जुगाराच्या महामेळाव्याला कोणकोण जुगाराचे गेम्बलर येणार हे उद्याच कळणार आहे.
संबंधित यंत्रणेने जुगारासारख्या अवैद्य धंद्यांना आळा घालण्यापेक्षा बैठकांना ग्रीन सिग्नल देऊन आपले पोट भरण्याचा सुरू केलेला धंदा ही जिल्ह्याची शोकांतिका….