You are currently viewing कोमसाप आयोजित कुडाळ येथील भाकरी आणि फुल जिल्हास्तरीय कवी संमेलन गाजले…..

कोमसाप आयोजित कुडाळ येथील भाकरी आणि फुल जिल्हास्तरीय कवी संमेलन गाजले…..

कुडाळ :

 

कोमसाप सिंधुदुर्ग व कुडाळ शाखा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भाकरी आणि फुल या जिल्हास्तरीय कवी संमेलनात अनेक कवींनी आपल्या कविता सादर करत कवी संमेलन फुलवले. या संमेलनात आदर्श कार्यकर्ता पुरस्कार जिल्हा खजिनदार व मराठी अध्यापक संघाचे राज्य अध्यक्ष श्री भरत गावडे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, कोमसाप पदाधिकारी सुरेश ठाकूर, कवी रूजारीयो पिंटो, जिल्हा सचिव विठ्ठल कदम, कुडाळ तालुकाध्यक्ष वृंदा कांबळी, सावंतवाडी तालुकाध्यक्षॲड संतोष सावंत, प्राध्यापक सुरेश गोवेकर,माजी जिल्हाध्यक्ष ॲड अरुण पणदूरकर, ॲड नकुल पारसेकर, सुरेश पवार, डॉ. दिपाली काजरेकर, माजी जिल्हाध्यक्ष वैद्य आदि उपस्थित होते. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष पणदूरकर व श्री वैद्य यांचा जिल्हाध्यक्ष म्हस्के यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. आजच्या या कवी संमेलनात वास्तववादी आणि सामाजिक भान असलेल्या कविता यावेळी सादर करण्यात आल्या. स्मिता नाबर, वर्षा परांजपे, डॉक्टर कोलते, ॲड नकुल पारसेकर, श्री सुरेश पवार, श्री पिंटू आदिनी कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वृंदा कांबळी, सूत्रसंचालन जिल्हा सचिव विठ्ठल कदम यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कवि रुजा रियो पिंटो उपस्थित होते. भाकरी आणि फुल या कवी संमेलनात खऱ्या अर्थाने नवोदित आणि ज्येष्ठ कवींनी ज्या कविता सादर केल्या त्या कवितेतून आपल्या भावना व्यक्त केल्या. आपल्या अवतीभवती असलेली सुखदुखी आणि यातून घडत असलेल्या घटना यावर भाष्य करणे म्हणजेच समाज मनाला जागे करणे होय आणि हेच कवीने करायला हवे. असे ते म्हणाले. यावेळी मोठ्या संख्येने मालवण, सावंतवाडी आणि कुडाळ आदि भागातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कवी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा