You are currently viewing शिक्षण हे नोकरीसाठी न घेता इतरांना रोजगार देण्याच्या दृष्टीने घ्या –  यशवंत रावराणे

शिक्षण हे नोकरीसाठी न घेता इतरांना रोजगार देण्याच्या दृष्टीने घ्या – यशवंत रावराणे

वैभववाडी

शिक्षण हे नोकरीसाठी न घेता इतरांना रोजगार देणाच्या दृष्टीने घ्या असे आवाहन श्री. यशवंत
रावराणे यांनी अध्यक्ष पदावरुन बोलताना केले. ते वैभववाडी येथील महाविद्यालयाच्या वार्षिक
पारितोषिक वितरण समारंभात बोलत होते. आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा
वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ बुधवार दिनांक २५ जानेवारी, २०२३ रोजी मा. यशवंत रावराणे विश्वस्त
महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी
व वैभववाडीचे तहसिलदार मा. श्री. प्रसन्नजीत चव्हाण उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर नायब तहसिलदार मा.
संकेत यमकर व सौ. कासकर मॅडम, स्थानिक समितीचे अध्यक्ष मा. सज्जनकाका रावराणे, सचिव मा. प्रमोद
रावराणे, प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे व इतर मान्यवर आणि सांस्कृतिक व जिमखाना विभागप्रमुख उपस्थित होते.
दिपप्रज्वलनानंतर मा. प्रसन्नजीत चव्हाण यांचा सत्कार मा. यशवंत रावराणे यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताबिक
मा. प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे तर महाविद्यालयाचे अहवाल वाचन जिमखाना प्रमुख प्रा. एस. बी. पाटील यांनी
केले. माणूस हा शैक्षणिक मोठी डिग्री घेऊन मोठा होत नाही तर त्याने त्याच्या जीवनामध्ये केलेल्या कर्माने मोठा
होतो. असे प्रतिपादन करताना मा. श्री. प्रसन्नजीत चव्हाण यांनी भगवतगीतेमधील संदर्भ दिले. यावेळी सर्व गुणवंत
विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्ती पत्रके व बक्षिसे वितरीत करण्यात आली. महाविद्यालयातून पुढील विद्यार्थी
आदर्श विद्यार्थी म्हणून निवड करण्यात आली व त्यांचा सत्कार करण्यात आला. कला विभागातून कु. सुशिल सुरेश
गुरव कु. अंजली शिवराम चव्हाण, वाणिज्य विभागातून कु. ओंकार राजेंद्र तावडे कु. विशाखा सुरेंद्र रावराणे,
विज्ञान विभागातून कु. सुधांशु गौतम तांबे, कु. मानसी सुधीर पडवळ, एम.एस्सी. विभागातून कु. ऋषिकेश सुधाकर
सावंत व एम.कॉम. विभागातून कु. प्रतिक्षा विष्णु रावराणे तसेच कु. ऋतुराज सुर्वे व कु. तेजश्री सांळुखे यांना
जनरल चॅम्पियनशीप देवून गौरवण्यात आले.
तसेच महाविद्यालयामध्ये कार्यरत असलेल्या खालील शिक्षकांचा पी.एच.डी. पदवी संपादन केल्यामुळे
संस्थापदाधिकारी व पाहुण्यांच्या हस्ते शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. डॉ. डी. एम. सिरसट
(रसायनशास्त्र), डॉ. एम. आय. कुंभार (कॉमर्स), डॉ. आर. एम. गुलदे (मानसशास्त्र), डॉ. एस. सी. राडे (इंग्रजी),
डॉ. एन. आर. हेदूळकर (प्राणीशास्त्र), डॉ. के. पी. पाटील (संख्याशास्त्र), डॉ. के. एस. पाखरे (रसायनशास्त्र) तसेच
महाविद्यालयीन सेवा बाजावत असतानाच एम. कॉम. चे शिक्षण पूर्ण केल्याबद्दल शिक्षकेत्तर कर्मचारी श्री. मुकुंद
रावराणे व अधिक्षक श्री. संजय रावराणे यांचाही सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणामध्ये मा. श्री. यशवंत रावराणे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण हे नोकरी करण्यासाठी न करता
इतरांना नोकरी देण्याच्या दृष्टीकोनातून शिक्षण घ्या. सिंधुदूर्ग जिल्हा पर्यटनाखाली आला असल्याने विविध
रोजगारांच्या उद्योगांच्या संधी प्राप्त झाल्या आहेत. या संधीचा विद्यार्थ्यांनी फायदा घेऊन कौशल्य विकासाचे विविध
कोर्सचा अभ्यास करुन जीवन उज्वल करावे असे आवाहन केले.
कार्यक्रमा शेवटी राष्ट्रीय मतदार दिनाच्या शुभेच्छा देवून सर्वांनी मतदार प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाचे आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. एम. आय. कुंभार यांनी मानले तर सुत्रसंचालन प्रा. सौ. एस. एस. पाटील व प्रा. निलेश कारेकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा