वैभववाडी
येथील मनसेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी अनेक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. मनसेच्या सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क अध्यक्ष सिद्धी नारकर यांच्या माध्यमातून या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. हा कॅम्प जिल्हा रुग्णालय कणकवलीतील डॉ. धर्माधिकारी व डॉ. पवार यांच्या निरीक्षणाखाली यशस्वी रित्या पार पडला.
यावेळी पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार श्री. परशुराम उपरकर, सिंधुदुर्ग कार्यकारणी सदस्य श्री. कुणाल किणळेकर, तालुका अध्यक्ष श्री. प्रसाद गावडे, विद्यार्थी सेना उत्तर सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष निलेश मेस्त्री, तालुका अध्यक्ष कणकवली धनराज गोरे, गिरीश उपरकर उपस्थित होते.