*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री. अरुण वि. देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*श्री.गोंदवलेकरमहाराज काव्य -चरितावली- पुष्प -१० वे*
—————————————–
लग्नानंतर नंतर आता तरी
श्रीमहाराज रहातील घरी
करतील मदत वडिलांना
सांभाळतील त्यांची कचेरी ।।
गुरू शोधण्याची मनी ओढ
ध्यानात वेळ जाऊ लागला
पंत आजोबांचा उद्देश सारा
शेवटी विफलच की हो झाला ।।
श्रीमहाराजांच्या मनातील या
तीव्र ओढीला घरचे कुणी ना
नाहीच समजू शकले, शेवटी
आईस सांगून,घराबाहेर पडले ।।
लंगोटी हेच वस्त्र हो अंगावरी
अखंड रामनाम ते ओठावरी
पोटापूरती मागती माधुकरी
गुरूंचा शोध सुरू झाला भूवरी ।।
अक्षरसेवा सादर श्रीगुरुचरणी
आनंद होई अरुणदासाच्या मनी ।।
—————————————–
कवी-अरुणदास”- अरुण वि.देशपांडे- पुणे
9850177342
—————————————–