You are currently viewing आचारसंहिता काळातील निविदांना स्थगिती द्या ; वायंगणी ग्रामस्थांची जि. प. सीईओंकडे मागणी

आचारसंहिता काळातील निविदांना स्थगिती द्या ; वायंगणी ग्रामस्थांची जि. प. सीईओंकडे मागणी

वेंगुर्ले

आगामी ग्रामपंचायत निवडणूक व आर्थिक व्यवहार डोळ्यासमोर ठेवून आचारसंहिता कालावधीत लावण्यात आलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी ग्रामपंचायतने प्रसिद्ध केलेल्या निविदांना तात्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी वायंगणी गावातील ग्रामस्थांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे…

वायंगणी गावातील विविध विकास कामांची गेल्या पाच वर्षापासून ग्रामस्थ मागणी करत असताना ती कामे त्यावेळी न करता पुढील महिन्यात ग्रामपंचायतीचा पाच वर्षांचा कालावधी संपत असल्याने आगामी निवडणूक व आर्थिक व्यवहार डोळ्यासमोर ठेवून वायंगणी गावातील विविध विकास कामांच्या निविदा एकाच वेळी २८ डिसेंबर रोजी वायंगणी ग्रामपंचायतीची सकाळी मासिक सभा घेऊन त्याच दिवशी संध्याकाळी निविदा प्रसिध्द करण्यात आलेल्या आहे.

बाब नियमबाह्य व आचारसंहितेचा भंग करणारी असल्याने सदर विकासकामांच्या निविदांना तात्काळ स्थगिती देऊन या निविदांची पुढील प्रक्रिया ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर करण्यात यावी. सदर निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेल्यास संबंधित सर्व अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना जबाबदार धरून त्यांच्यावर शासन नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते भिकाजी गावडे, भालचंद्र सातार्डेकर, योगेश तडिल, अर्जुन कोरगांवकर, संतोष साळगावकर, श्यामसुंदर मुणनकर, रवींद्र पंडित, नाना कोळेकर, सत्यब्रह्म पंडित, रमाकांत धोंड, आत्माराम मठकर, प्रसाद पेडणेकर, सुहास आसोलकर, भिवा भगत, ज्ञानेश्वर पेडणेकर यांच्यासह ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा