सिंधुदुर्गनगरी
स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी समजपूर्वक वाचनाचा पाया पक्का असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत या नायर यांनी केले. निपुण भारत अंतर्गत शरद कृषी भवन येथे निपुण ध्येय १ व ध्येय २ या केंद्रप्रमुख व शिक्षक यांच्यासाठी कार्यशाळेमध्ये ते बोलत होते. भाषा पंधरवडा कालावधीचे औचित्य साधून नायर यांच्या हस्ते जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत आराखडा तयार करून ‘कृतीप्रवण स्वयंअध्ययन कार्ड विषय भाषा’ चे अनावरण करण्यात आले.
कार्ड निर्मिती करणारे शिक्षक, राज्यस्तरावरील माध्यमिक व प्राथमिक नवोपक्रम स्पर्धेतील विजेते शिक्षक यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमासाठी SCERT, पुणेच्या माजी मराठी विभागप्रमुख लोहकरे, प्राचार्या ए. पी. ताशीकर, डाएटचे प्रदीप कुडाळकर, शिक्षणाधिकारी सुषमा कोंडुसकर, अधिव्याख्याता, डाएट, डॉ. एल. बी. आचरेकर, अधिव्याख्याता, डाएट त्याचप्रमाणे लीडरशिप फॉर इक्विटी (LFE) कार्यशाळेचे व्याख्याते अमित गवळे, चैताली, सलील उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन जि. प. शाळा ओरोस यावेळी कृतीप्रयण स्वयंअध्ययन खुर्दच्या शर्वरी राजाध्यक्ष यांनी केले.