*वक्रतुण्ड साहित्य समूहाचे संस्थापक अध्यक्ष लेखक कवी जगन्नाथ खराटे लिखित अप्रतिम लेख*
*प्रजासत्ताकाचा अर्थ..*
मानवाला सर्वांत जास्त प्रिय काय असेल तर, कुणीही स्वातंत्र्य हे उत्तर देतील ह्यांत शंकाच नाही..
खरं तर स्वातंत्र्य हे सृष्टीतील सर्वच जिवसजिवांनाही प्रिय आहे अन् तै त्याचा उपभोग सर्व प्राणीमात्रं घेतात… पन् ह्याला अपवाद म्हणजे फक्त मानव हा अतिबद्धिमान प्राणी असल्याने तो देवांना दिलेल्या स्वातंत्र्याचा जास्तीत जास्त उपभोग घेवुन ईतर जिवसजिवांच्या स्वातंत्र्य सुद्धा हिसकावून घेत असतो.अन त्यामुळेंच तो स्वतःलाही आणि इतरांच्याही दुःखास. कारणिभुत ठरतो ही एक विडंबना आहे..
खरंतर सर्वांना आपली जन्मभुमी प्रिय असते पन्.जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा आपल्याला मातृभूमी म्हणजे.. भारत देशंच प्रिय आहे. ….. आपल्या देशाच्या इतिहासात २६ जानेवारी हा दिवस आपंन राष्ट्रीय सन,उत्सवसमजुन साजरा करतो… आपण २६ जानेवारी १९५० पासून राज्य घटनेनुसार, प्रत्येकास न्यायाचे राज्य सुरु झाले.अन स्वातंत्र्य समता बंधुतेचं राज्य सुरु झालं.
स्वातंत्र्यानंतर देशात कारभार चालावण्यासाठीचे विचारविनिमय,झाले अन् सर्वानुमते. ९ डिसेंबर १९४६ ला घटना समितीचे ह गठीत झाली आणि११डिसेंबर १९४६ रोजी डॉ.राजेंद्रप्रसाद समितीचे अध्यक्ष झाले.यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्षतेखाली भारतीय संविधानाचा” मसूदा समिती स्थापन होवुन,अनेक बैठका.. चर्चासत्रानंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान निर्मिती झाली..
घटना किंवा संविधान म्हणजे सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र.. दर्जा व संधी ह्या समसमान मिळाव्यात. राष्ट्र, समाज आणि व्यक्ती,प्रतिष्ठा व एकता किंबहुना एकात्मता व बंधुभाव हे घटनेचे मुख्य घटक ठरले.. आणि २६ जानेवारी १९५० पासून ब्रिटिश कायदे हद्दपार करुन भारतीयानी तयार केलेल्या स्विकृत संविधानाप्रमाणे स्वतंत्र भारतात प्रजासत्ताक राज्य सुरू झाले..
समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री या मूल्यांचा राज्यघटनेत समावेश करण्यात आला
आपल्या भारतदेशातील प्रत्येक नागरिकाला मुक्तपणे देशभर संचार करुन भावनांना मुक्त वाट करुन परस्परांच्या सुखदुखां सहभागी होण्याचे स्वातंत्र्य ही घटनेची अमुल्य देणगी ठरली.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या अन् आत्मसमर्पण करणार्या देशभक्तांचे आपण शतशः आभारी ऋणी राहुन, तसेच आपल्या मातृभुमी अथवाजन्मदात्रीचे ऋण फेडण्यासाठी, जात-पात भेदभाव सोडून मानव धर्मासाठी धर्म ज्ञान विज्ञानाची कवाडे उघडून जगातील सर्वोत्तम ज्ञानाने मानवी जीवनात अमुलाग्र बदल करुन क्रांती घडवने येऊ आपले कर्तव्य ठरते.. देशाच्या प्रगतीची अचंबित करणारी गगनभरारी नक्कीच आम्हाला प्रगतीपथावर नेईल ह्यांत शंकाच नाही. जगात आमच्या देशाची मान सतत उंचावणे हेच आमचे एकमेव ध्येय आहे अन् ते आपन सर्वजण मिळून पुर्णत्वास नेवुया…
जगन्नाथ खराटे– ठाणे
२६जानेवारी२०२३