अँड.प्राजक्ता म.शिंदे यांनी केला यशस्वी युक्तिवाद
कणकवली-
जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित आरोपी बाबासो पाटील व.३ यांची आज ओरोस येथील मे.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी प्रत्येकी पंधरा हजाराच्या जामिनावर मुक्तता केली. याकामी अँड. प्राजक्ता म.शिंदे यांनी काम पाहिले.
याप्रकरणी थोडक्यात हकीकत अशी कि,
फिर्यादी सुमन मधुकर कांबळे,राहा-राधानगरी, कोल्हापूर यांनी दिलेली फिर्याद अशी कि, दिनांक २१/०१/२०२३ रोजी सकाळी १० वाजताचे मानाने फिर्यादी ह्या त्यांचे पती व इतर साक्षीदार कामगारांसह ऊस कापण्यासाठी गेल्या होत्या. तेथील काम न झाल्याने त्या दुपारी घरी येवून १५.०० वाजताचे मानाने गाव मौजे लोरे नं 2, वैभववाडी येथील सर्व्हे नं.१३८, हिस्सा नं.७ या जमिनीत असलेल्या विहिरीतील पंप सुरु करण्यासाठी गेले असता तेथे संशयित आरोपी बाबासो पाटील व त्यांची पत्नी व मुलगा यांनी फिर्यादी व फिर्यादी यांचे पतीस जातीवाचक शिवीगाळ व धमकी देऊन फिर्यादीचे मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून वैभववाडी पोलीस स्टेशन यांनी गुन्हा रजिस्टर क्र.०५/२०२३ भा.द.वि.कलम ३५४,३५२,५०४,५०६ अनु.जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधि.१९८९ चा सुधारीत अधिनियम २०१५ चे कलम ३(१)(w)(i), ३(१)(r), ३(१)(s), ३(२)(va) हा गुन्हा संशयित आरोपी बाबासो पाटील, पूजा पाटील व दिग्विजय पाटील यांचेविरुद्ध दाखल करण्यात आला होता.आरोपी यांना दिनांक २३/०१/२०२३ रोजी अटक करून मा.विशेष न्यायाधीश ओरोस यांचे कोर्टात हजर केले असता कोर्टाने आरोपी यांना न्यायालयीन कोठडी देणेबाबत आदेश केले. संशयित आरोपी यांनी ओरोस येथील मा.विशेष न्यायाधीश यांचे कोर्टात दाखल केलेल्या जामीन अर्जावर आज रोजी सुनावणी होऊन मा.विशेष न्यायाधीश यांनी संशयित आरोपी यांची रक्कम रुपये पंधरा हजार च्या जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश पारित केले.संशयित आरोपी यांच्या वतीने अँड.प्राजक्ता म.शिंदे यांनी यशस्वी युक्तिवाद केला.