*आय ए एस विशाल नरवाडे दि २८ जाने ला करणार मार्गदर्शन*
अमरावती
सुप्रसिद्ध आयएएस अधिकारी व नाशिक विभागात कळवण तालुक्यातील उपविभागीय अधिकारी व आदिवासी विभागात प्रभारी प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत असणारे विदर्भाचे सुपुत्र श्री विशाल नरवाडे IAS हे येत्या शनिवार दि.२८ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वतः येणार आहेत. हा कार्यक्रम मिशन आयएएसच्या पुढाकाराने अकोला येथील सिटी कोतवाली व रिगल टॉकीज जवळील बाबूजी देशमुख वाचनालयात आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे अशी विनंती बाबूजी देशमुख वाचनालयाचे अध्यक्ष श्री. महादेवराव भुईभार सचिव श्री अनुराग मिश्र व मिशन आयएएसचे संचालक प्रा. डाँ. नरेशचंद्र काठोळे यांनी एका संयुक्त पत्रकान्वये केली आहे .
श्री विशाल नरवाडे हे बुलढाणा जिल्ह्यातील धार तालुक्यातील रहिवासी आहेत. मी आयएएस अधिकारी होणारच या पुस्तकापासून प्रेरणा घेऊन त्यांनी आय.ए.एस.ची तयारी सुरू केली. प्रथम त्यांना आयपीएस हा कॅडर मिळाला .ते पश्चिम बंगाल येथे रुजू झाले. शासकीय नोकरीत असतानाच त्यांनी परत आय ए एस ची परीक्षा दिली. त्यामध्ये त्यांना यश प्राप्त झाले व संपूर्ण भारतातून त्यांचा ८१ वा क्रमांक आला. सुरुवातीला नाशिकला येण्यापूर्वी सांगली येथे ते सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. आपल्या विदर्भातील विद्यार्थी बहुसंख्येने प्रशासनात जावे यासाठी ते सातत्याने विदर्भातील मुलांना स्पर्धा परीक्षाबाबत सविस्तर मार्गदर्शन करीत असतात. या शनिवारी ते अकोला येथे येत असून सकाळी दहा वाजता आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा अशी विनंती आयोजकांनी केली आहे.
==============
प्रकाशनार्थ.
प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे.
संचालक. मिशन आयएएस .अमरावती 9890967003