You are currently viewing राज्यात अमेरिकेच्या टेस्ला कंपनीचा प्रकल्प…

राज्यात अमेरिकेच्या टेस्ला कंपनीचा प्रकल्प…

सुरु करण्यासाठी शासन सकारात्मक

मुंबई

पर्यावरण पूरक इलेक्ट्रीक वाहन निर्मिती क्षेत्रातील अमेरिकेतील आघाडीची टेस्ला कंपनीने महाराष्ट्रात प्रकल्प सुरू करावायासाठी शासन सकारात्मक असून महाविकास आघाडी सरकारने यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या संदर्भात कंपनीच्या प्रतिनिधींसोबत उद्योगमंत्री सुभाष देसाईपर्यटन तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ऑनलाईन वेबिनारद्वारे चर्चा केली.

            राज्य शासनाने 2019 मध्ये नवीन औद्योगिक धोरण केले असून यामध्ये इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे येत्या काळात इलेक्ट्रिक वाहननिर्मिती कंपन्यांना उत्पादनासाठी महाराष्ट्रात मोठी संधी आहे. याच अनुषंगाने टेस्ला कंपनीने महाराष्ट्रात आपला प्रकल्प सुरू करावाअसे राज्य शासनाच्यावतीने उद्योगमंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांनी यावेळी सांगितले. टेस्ला कंपनीला प्रकल्प सुरू करण्यासाठी विशेष सुविधांसह प्रोत्साहनपर सवलत दिल्या जातीलअसे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

            टेस्ला कंपनीने वाहन निर्मिती प्रकल्प व संशोधन आणि विकास (आर अँड डी) केंद्र राज्यात सुरू करावेत्यांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा राज्य शासन पुरविलअशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी दिली.

            प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरण पूरक वाहन निर्मितीला चालना देण्याचे राज्य शासनचा मानस आहे. त्यादृष्टीने राज्य शासनाने काही धोरणं निश्चित केल आहे येत्या काळात इलेक्ट्रीक वाहनांमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. विशेषतः मुंबईत इलेक्ट्रिक वाहनांचा अधिक वापर झाल्यास ते पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त ठरेलअसे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले.

            दरम्यानटेस्ला कंपनीच्यावतीने रोहन पटेल( ग्लोबल डायरेक्टरटेस्ला)डॉ. सचिन सेठ हे चर्चेत सहभागी झाले होते. टेस्लासाठी महाराष्ट्रात मोठी बाजारपेठ असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी नगर विकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणीउद्योग विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डीएमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगनउद्योग विभागाचे विकास आयुक्त हर्षदीप कांबळे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा