*कुडाळ येथील मूर्तिकार किरण परब यांच्या उल्हानगरमधील सिद्धिविनायक कलामंदिरमध्ये फिरवला शेवटचा हात*
कुडाळ :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील गणेशमूर्तीकार श्री.किरण संभाजी परब यांनी माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने आपल्या सिद्धीविनायक कलामंदिर उल्हासनगर या शाळेत विविध आकाराच्या अनेक गणेशमूर्ती बनविल्या आहेत. मुंबई येथे काही ठिकाणी सार्वजनिक तर काही घरांमध्ये देखील गणेश जयंतीच्या निमित्ताने श्रींची स्थापना केली जाते. त्यामुळे मुंबईत श्री गणेशाच्या मूर्तीला मोठ्या प्रमाणावर मागणी असते.
श्रीगणेश भक्तांची वाढती मागणी लक्षात घेता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील गणेश मूर्तिकार श्री. किरण परब यांनी छोट्या, मोठ्या अशा विविध आकारातील आणि वेगवेगळ्या रूपातील अनेक श्रीगणेश मूर्ती बनविल्या आहेत. २५ जानेवारी रोजी माघी गणेश जयंती असल्याने गणेश मूर्तींवर अखेरचा हात फिरविला जात आहे. श्री. किरण परब यांच्या सोबत त्यांची अर्धांगिनी सौ. अश्र्विनी किरण परब देखील रंग कामात व्यस्त होत्या. श्री. किरण परब उभयतांनी आकर्षक गणेशमूर्ती साकारल्या असून आजपासून त्याचे वितरण सुद्धा केले जात आहे.
(छाया – प्रमोद कांदळगावकर)