You are currently viewing इयत्ता १० वी व १२ वी मधील विद्यार्थ्यांसाठी “तणावमुक्त परीक्षा ” या विनामूल्य कार्यशाळेचे आयोजन

इयत्ता १० वी व १२ वी मधील विद्यार्थ्यांसाठी “तणावमुक्त परीक्षा ” या विनामूल्य कार्यशाळेचे आयोजन

कणकवली

ज्ञानदा शिक्षण संस्था संचालित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे यांच्यामार्फत २२ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजता इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी “तणावमुक्त परीक्षा ” या मानसशास्त्रीय समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे ,या मध्ये मनोविश्लेषक तज्ञ सौ.मंजिरी निलेश घेवारी या कार्यशाळेमध्ये “स्ट्रेस मॅनेजमेंट, रिलॅक्ससेशन टेक्निक्स ,यश अपयशाची कारणे, सकारात्मक विचार, आत्मविश्वास, परीक्षेची तयारी ,वेळेचे नियोजन कसे करावे ,तणावमुक्त वातावरणात अभ्यास कसा करावा आणि परीक्षा कालावधीमध्ये आनंदी व समाधानी राहण्याचे तंत्र यावर मार्गदर्शन करणार आहेत
तरी तणावमुक्त परीक्षा देऊन यश प्राप्त करण्यासाठी १० वी व १२ वी तील विद्यार्थ्यांनी कार्यशाळेस उपस्थित राहावे असे आवाहन आयडियल इंग्लिश स्कूल च्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा