You are currently viewing निरवडे येथील रस्सीखेच स्पर्धेत सिध्देश्वर म्हाळाईदेवी संघ विजेता तर उपविजेता कलेश्वर वेत्ये संघ

निरवडे येथील रस्सीखेच स्पर्धेत सिध्देश्वर म्हाळाईदेवी संघ विजेता तर उपविजेता कलेश्वर वेत्ये संघ

सावंतवाडी

महापुरुष कला क्रिडा मंडळ, निरवडे माळकरवाडी यांच्यावतीने भव्यदिव्य जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेत तळवडे येथील सिध्देश्वर म्हाळाईदेवी संघाने विजेतेपद पटकावले. तर कलेश्वर वेत्ये संघ उपविजेत्या पदाचा मानकरी ठरला. तसेच उकृष्ट फ्रंटमॅन अभिषेक तेंडोलकर,कलेश्वर वेत्ये तर उकृष्ट लास्टमॅन राजा मांजरेकर, म्हाळाईदेवी संघ तळवडे यांनी मिळवले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, योगेश नाईक, निरवडे ग्रामपंचायत सरपंच सुहानी गावडे, सदस्य संदिप पांढरे, दशरथ मल्हार, अर्जुन पेडणेकर,तसेच राष्ट्रवादी काँग्रेस कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे परब, सावंतवाडी नगरपरिषद माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, सावंतवाडी कझ्युंमर्स सोसायटीचे चेअरमन प्रमोद गावडे, जेष्ठ पत्रकार अभिमन्यु लोंढे, अमोल टेमकर, शुभम सावंत नीलेश परब,आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व राष्ट्रीय स्तरावर रस्सीखेच स्पर्धेत सहभागी झालेल्या अर्पिता राऊळ यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. स्पर्धेचे समालोचन सुप्रसिद्ध समालोचक बादल चौधरी यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा