*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सन उतरान उना ….*
उनी उतरान उनी सन करा गोड गोड
तियगुयना पोईले देऊ लाडूसनी जोड
सालभर बोलो गोड उतरान ती सांगस
कडू कारलं मानुस असा का बरं वागसं….
प्रेम देवो प्रेम लेवो ऱ्हाय त्याम्हाज भलाई
करू नको रे मानसा तू कोनिज बुराई
कडू बोलाना त्या फये कसा इथिन रे गोड
अरे मानसा मानसा तुनं कडूपनं सोड…
एक हातीवरी दिसी दोनी हातीवरी लिसी
देवाम्हाज मोठं सुख, अरे कोठे लई जाशी
पुन्यवान हाऊ जलम जाय सार्थक करीनी
मोठा व्हता गुनवान भला म्हनतीन कोनी …
सालं येस सालं जास ऱ्हास मानुस कोरडा
निंघी जास बठ्ठी आयु हुई जास ना धरडा
मंग व्हस पश्चाताप नही इचारत कोनी
तुनी मनमानी सांग काय भाव ती पडनी …
नातंगोतं धरी ऱ्हावो बोलो गोड गोड गोड
जशी “सद “मा बुडाई गोड पपईनी फोड
नही व्हयना फायदा कडू बोलिसनी कोना
तियगुय ल्या हो बोला, बोला गोड गोड म्हना ….
मनभरीन सदिच्छा प्रेम वाटसं तुमले
करा संकल्प मनम्हा मांगे टाकसू गुयले
सालभर ऱ्हाई गोडी आसं आश्वासनं द्या ना
हाऊ आशीर्वाद ऱ्हाई उतरान ना सन ना ….
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : १४ जानेवारी २०२२
वेळ : दुपारी : १२:११