*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच… लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्य लेखक कवी सत्तू भांडेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*असं कसं हो सायब…*
शेतात पिकल तवाच तर बाजारात इकल
अहो सायब किती कराल अजून चाल ढकल
काय माहीत तुम्हास सायब पोटाचे चिमटे
तुमचे मातर खुर्चीचे गणित बराबरच जुळते
पोखराव लागते हो माती उकरून उकरून
फाटलेल आभाळ सायब अंगावर पांघरूण
ठिगळं घालतो आम्ही तुम्ही मातर सुटाबुटात
कवाचं मरतोय सायब राबून शेतातल्या शेतात
तवा कुठं ठेचा आणिक मिळते कांदा भाकर
कुठं हो आमच्या नशिबी तुमचं पिझ्झा बर्गर
बघा जमत असेल तर पेरून नशिब मातीत
तवा कुठं फुटतात हो कोंब बियाणां शेतीत
मतासाठी गाड्या तुमच्या भटकतात हो इकडं
मग तर घालावं लागते आम्हा तुम्हासनी साकडं
तुमची ती शहरं अणिक आमची म्हणे गावखेडे
सायब येळ गेल्यावर कळते म्हणुन आम्ही येडे
सत्तू भांडेकर, गडचिरोली