You are currently viewing पाट येथे बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू

पाट येथे बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू

कुडाळ :

कुडाळ येथील पाट गांधीनगर येथे दिनांक 12 जानेवारी रोजी श्री. बाळकृष्ण बापू खोत यांचे शेतविहीरीमध्ये भक्ष्याच्या मागे धावताना पाण्यात पडलेने सुमारे 4 वर्षे वयाची वन्यप्राणी बिबट (मादी) मृत आढळून आली. त्याबाबतची माहिती त्यांनी वनपाल नेरूर त हवेली श्री धुळु कोळेकर यांना दिली असता वनपरिक्षेत्र कुडाळच्या रेस्क्यू पथकाने रात्री 10.30 चे दरम्यान तात्काळ घटनास्थळी जाऊन सुमारे 20-25 फूट खोल विहिरीतून मृत बिबट मादीस पिंजऱ्याच्या साहाय्याने बाहेर काढले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी कुडाळ श्री. कोठार यांचेकडून मृत मादी बिबटचे शवविच्छेदन करण्यात आले

त्यानुसार पाण्यात बुडून श्वास गुदमरून तीचा मृत्यू झाला असलेचे त्यांनी सांगितले. मृत मादी बिबटचे सर्व अवयव सुस्थितीत असल्याची खात्री केले नंतर तीस शासकीय जागेमध्ये दहन करणेत आले.

यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ श्री. अमृत शिंदे यांनी जखमी वन्यप्राणी नागरिकांना आढळ्यास तात्काळ वनविभागाला माहिती द्यावी तसेच रेस्क्यू पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत दोरीच्या साहाय्याने फळी/ओंडके विहिरीमध्ये सोडावी जेणे करून विहीरीमधे पडलेल्या प्राण्याला आधार मिळेल त्यास रेस्क्यू करून त्यांचा जीव वाचवता येईल.

उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री. एस. एन. रेड्डी, मानद वन्यजीव रक्षक श्री. नागेश दफ्तरदार यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक (प्रादे व कॅम्पा ) सावंतवाडी श्री. सर्जेराव सोनावडेकर, वनक्षेत्रपाल कडावल अमित कटके, वनपाल नेरूर त हवेली धुळु कोळेकर, वनपाल मठ सावळा कांबळे, सिंधुदुर्ग वाईल्ड लाईफ इमरजन्सी रेस्क्यू संस्थेचे अनिल गावडे, वैभव अमृस्कर वाहनचालक राहुल मयेकर यांनी सदर कार्यवाही पार पाडली.

प्रतिक्रिया व्यक्त करा