You are currently viewing वक्रतुंड साहित्य, कला संस्कृती मंच ठाणेतर्फे, नववर्ष मकरसंक्रांतीच्या निमित्ताने आॉनलाईन काव्यसंमेलन संपन्न ‌

वक्रतुंड साहित्य, कला संस्कृती मंच ठाणेतर्फे, नववर्ष मकरसंक्रांतीच्या निमित्ताने आॉनलाईन काव्यसंमेलन संपन्न ‌

*वक्रतुंड साहित्य, कला संस्कृती मंच ठाणेतर्फे, नववर्ष मकरसंक्रांतीच्या निमित्ताने आॉनलाईन काव्यसंमेलन संपन्न ‌..*

ठाणे-शनीवार दि१४ जानेवारी २०२३,रोजी संध्याकाळी पांच वाजता नववर्ष मकरसंक्रांतीच्या निमित्ताने वक्रतुंंड साहित्य मंचातर्फे आॉनलाईन काव्यसमेलन नुकतेच संपन्न झाले..
गुगल मिटवर होणारा ह्या संमेलनाचे वक्रतुंड साहित्य,समुहाच्या कार्याध्यक्षा, संन्मा-प्रितिजी काकडे यांनी गुगलमिट ऑनलाईन ,संमेलनाचे आयोजन केले होते, या आॉनलाईन संमेलनाचे सु्त्रसंचलन, प्रितीजी काकडे व सौ मनीषा जोशी मॅडम यांनी उत्तमरित्या केले होते. शनिवारी संध्याकाळी पाच वाजता सन्मा-सुनिता कपाळे ह्यांनी,गणेशवंदना,स्वागतगीत गावुन सुरवात झाली.काव्यसंमेलनास उपस्थित मान्यवरांत सन्मा-प्रा,-सतिश शिरसाठ,सौ सुरेखा गायकवाड,,सौ निर्मला बस्तवडे, सौ साधना शेळके इ मान्यवर उपस्थित होते, नववर्षाच्या सुरुवातीलाच हा प्रेमाचा गोडवा घेवून येणारा हा सन म्हणजे मकरसंक्रांत किंबहुना तिळसंक्रात आहे… अन्, ह्यासाठी तिळसंक्रांतीचे महात्म्य वर्णन करणार्या कवितांचे सादरीकरण करण्यात आले, सौ मनीषा जोशी मॅडम ह्यांनी संक्रांतीच्या निमित्ताने दोन कविता सादर करुन मकरसंक्रांतीचे महत्व विशद केले..


त्याचप्रमाणे,प्रा-सतिश सिरसाठ, सौ निर्मला बस्तवडे, साधना शेळके, ह्या सर्वांनींच नववर्षाच्या निमित्ताने मकरसंक्रांतीच्या विषयावर कविता सादर केल्या.एकुनंच काव्य सादरी करणाचा कार्यक्रम बहारदार झाला.. वक्रतुंड समुहाचे प्रमुख -जगन्नाथ खराटे, काही कारणास्तव उपस्थित नसले तरी त्यानी संपर्क साधुन , सर्वांना़च भरभरून शुभेच्छा दिल्या, आणि सर्व सहभागी मान्यवरांना डिजिटल सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येईल असे सांगितले.वक्रतुड मंचाच्या कार्याध्यक्षा- प्रितीजी काकडे ह्यांनी सर्वांनी साहित्य उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन केले , आणि
मान्यवरांचे आभार मानुन कार्यक्रम संपन्न झाले असे घोषित केले..

.. जगन्नाथ खराटे…

प्रतिक्रिया व्यक्त करा