सावंतवाडी
मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी सावंतवाडीत जागा उपलब्ध होत नसेल तर मळेवाड येथे त्यासाठी लागणारी स्वमालकीची तीन एकर जागा विना मोबदला देण्यास आपण तयार आहे, अशी भूमिका मळेवाडचे उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते हेमंत मराठे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान जागा घेतली, तर आमच्या ज्या अटी आहेत. त्या मात्र पूर्ण झाल्यास तात्काळ जागा उपलब्ध करून देता येईल, असेही त्यांनी सांगितले आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्र दिले आहे.
त्यात जसे म्हटले आहे की, जागा कुठे उपलब्ध होत नसल्यास मळेवाड येथे स्वमालकीची तीन एकर जागा विना मोबदला मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलसाठी देण्याची आपली तयारी आहे. यासाठी आमच्या ज्या अटी आहेत, त्या मात्र पूर्ण झाल्या तर तात्काळ जागा उपलब्ध करून दिली जाईल. सावंतवाडी तालुक्यासह दोडामार्ग, वेंगुर्ला तालुक्यातील रुग्णाकरिता शासनाचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हवे हे कित्येक वर्षापासूनची जनतेची मागणी आहे. सावंतवाडी येथील मल्टीस्पेशलिटी हॉस्पीटल काही कारणास्तव वादात अडकल्याचे समजते. मात्र हे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रद्द होऊ नये, यासाठी मी ही जमीन देत आहे. इतर सोयी सुविधा करिता ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे सर्व सहकार्य करेल, असेही त्यांनी म्हणाले आहे.