You are currently viewing स्वर्गीय नाटककार विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दी निमित्त मालवणात १६ जानेवारी रोजी कार्यक्रम

स्वर्गीय नाटककार विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दी निमित्त मालवणात १६ जानेवारी रोजी कार्यक्रम

मालवण

मराठी रंगभूमीवर संगीत नाट्यक्षेत्रात ज्यांनी अजरामर संगीत नाट्य देऊन जनमानसात संगीत नाटक रुजविण्यात महत्वपूर्ण योगदान दिले त्या नाटककार स्वर्गीय विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून अष्टपैलू कलानिकेतन मालवण यांच्या वतीने दिनांक १६ जानेवारी २०२३ रोजी रात्रौ सात वाजता दत्त मंदिर भरड मालवण येथे विध्यादर्शन संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात नाटककार स्वर्गीय विद्याधर गोखले यांच्या संगीत नाटकातील काही निवडक नाट्यगीते स्थानिक कलाकार ऍड. दिलीप ठाकूर, सुनील परुळेकर, महेंद्र मराठे, पलाश चव्हाण, आस्था आचरेकर, कु. गरीमा आदी सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे निवेदक म्हणून विनोद सातार्डेकर, व्यवस्थापक सुधीर कुर्ले, साथ संगीत ऑरगन श्री. भालचंद्र केळुसकर बुवा, तबला सुधीर गोसावी हे करणार आहेत. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन अष्टपैलू कलानिकेतन यांच्या वतीने अध्यक्ष भालचंद्र केळुसकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा