You are currently viewing पाऊस

पाऊस

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी मुबारक उमराणी लिखित अप्रतिम काव्यरचना*

*पाऊस*

पाऊस येता
तुला आठवतो
पापणपंखात
तुला साठवतो

विद्युल्लतेसवे
कडाडतेस तू
पाऊस वादळी
धडाडतेस तू

छत ही वाजते
तडतड बाजा
भिजवतो माती
हा पाऊसराजा

चिंब चिंब झाडी,
थेंबाची बरसात
संसारवादळी
तुझीच ग साथ

पाऊस शिकवी
जीवनाचे मोल
आनंदे नादतो
मनात या ढोल

मुबारक उमराणी
सांगली
९७६६०८१०९७.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × five =