सिंधुदुर्ग :
दि. ११ डिसेंबर २०२२ रोजी दिल्ली येथे झालेल्या ॲम्युचर कबड्डी फेडरेशन फॉर इंडियाच्या राष्ट्रीय कबड्डी पंच परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. संपूर्ण भारतातून एकूण ३८२ परीक्षार्थी या परीक्षेला बसले होते. महाराष्ट्र राज्यातून ८८ परीक्षार्थी या परीक्षेत समाविष्ट झाले होते. पूर्ण भारतातून एकूण ८३ परीक्षार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या माध्यमातून या परीक्षेत दोन परिक्षार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
हे दोन्ही परिक्षार्थी या परीक्षेत पास झाल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा १००% निकाल लागला आहे. मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनचे वरिष्ठ पंच सुदिन अशोक पेडणेकर (कणकवली ) आणि जयेश राजन परब (वेंगुर्ला) हे उत्तीर्ण झाले आहेत. तर सुदिन अशोक पेडणेकर यांचा भारतात सहावा क्रमांक आला आहे. त्यांच्या या यशात त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनचे कार्यवाही दिनेश चव्हाण, सहकार्य वाहक शैलेश नाईक, कार्याध्यक्ष संजय पेडणेकर आणि खजिनदार मार्टिन अल्मेडा यांचे मार्गदर्शन लाभले. जय महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे पंच अध्यक्ष विश्वास मोरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. या त्यांच्या यशाबद्दल संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन सर्व कबड्डी प्रेमी, कबड्डी खेळाडू, कार्यकर्ते आणि मित्रमंडळींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.