You are currently viewing जागतिक स्तरावर विज्ञान तंत्रज्ञान यामध्ये होणारे बदलानुसार प्रयोग व्हावेत: विवेकानंद नाईक

जागतिक स्तरावर विज्ञान तंत्रज्ञान यामध्ये होणारे बदलानुसार प्रयोग व्हावेत: विवेकानंद नाईक

५० वे तालुकास्तरीय प्रदर्शन पिकुळेत संपन्न

दोडामार्ग

जागतिक स्तरावर सद्यस्थितीत तंत्रज्ञानात अनेक बदल हवे असतात आणि हे बदल वर्षागणिक किंवा महिनागणिक बदल होत नसून दिवसागणिक होत आहेत. त्यामुळे आपल्या शिक्षकांनी व मुलांनी जगाच्या मागणीप्रमाणे आपल्या ज्ञानाचा वापर करून जगात आतापर्यत केले नाही केले असे नवनवीन प्रयोग सर्वागीण हितासाठी असावेत. यामधूनच नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध लावा त्यातून भविष्यातील नवीन तंत्रञन निर्माण होतील हेच यश या विज्ञान तंत्रज्ञान आत्मसात केले तरच भावी पिढीला प्रेरणादायी हे प्रदर्शन ठरेल असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक विवेकानंद नाईक यांनी केले.

पिकुळे येथील श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालयात आज ५० वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या प्रदर्शनाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी श्री. नाईक हे कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटन म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, माजी मुख्याध्यापक अन्वर खान, जिल्हा बँक माजी संचालक प्रकाश गवस, जि. प. चे माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, उपशिक्षणाधिकारी शोभराज शेर्लेकर, शिक्षणाधिकारी योजना प्रदीपकुमार कुडाळकर, गटशिक्षणाधिकारी निसार नदाफ, सहाय्यक गटविकास अधिकारी निलेश जाधव, सहसचिव नंदकुमार नाईक, विस्तार अधिकारी दीपा दळवी, केंद्र प्रमूख डेडा पावरा, सुर्यकांत नाईक, राजलक्ष्मी लोंढे गुरुदास कुबल, सदाशिव पाडगावकर मुख्याध्यापिका स्नेहल गवस, गणित विज्ञान मंडळ जिल्हाध्यक्ष आर डी फर्जद, तालुका अध्यक्ष आंनद बामणीकर, प्रशालेचे शालेय समिती सदस्य प्रकाश गवस, रामचंद्र गवस झरेबांबर सरपंच अनिल शेटकर, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष संतोष घोगळे, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष शाबी तुळसकर आदी उपस्थित होते.

श्री. नाईक पुढे म्हणाले की, आपण यापूर्वीही अनेक विज्ञान प्रदर्शनांच्या कार्यक्रमांना गेलो आहे. बऱ्याचवेळा आपल्याला तेच – तेच प्रयोग पहावयास मिळाले. तसेच तेच तेच प्रयोग करण्यापेक्षा शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी ह्यामध्ये बदल करून आपल्या ज्ञानाच्या कक्षा वाढवून नाविन्यपूर्ण प्रयोग करावेत. आपल्या जगात ज्या शास्त्रज्ञानी वेगवेगळे शोध यापूर्वी लावले आहेत त्यांच्याकडे काही वेगळी शक्ती नव्हती तेही सामान्य मनुष्यच होते पण त्यांनी आपल्या बोद्धीक क्षमतेचा वापर करून असे बरेच शोध लावले आहेत. तशाच प्रकारे मुलांनीही त्यांचे विचार, त्यांचे परिश्रम अंगीकारावे व असे नवनवीन शोध लावावे असेही शेवटी विवेकानंद नाईक यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांनी विज्ञानरुपी ज्ञानाचा वापर करावा – अन्वर खान

सध्याच्या युगात प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाची प्रगती ही सामान्य मनुष्याला थक्क करणारी आहे. अस एकही क्षेत्र नाही की तिथे तंत्रज्ञान नाही आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने हे तंत्रज्ञान आपल्या जीवनात अंगीकारावे व नवीन शोध लावण्याचा प्रयत्न करावा. चीन मधून आपल्या भारत देशात अब्जावधी रुपयांची लहान मुलांसाठी व मोठ्यांसाठीही खेळणी आयात केली जातात. त्यामुळे आपल्याही मुलांनी स्वतःच्या विज्ञानरुपी ज्ञानाचा वापर करून अनेक छान खेळणी बनवावीत किंवा नाविन्यपूर्ण एखादं मॉडेल बनवा असे आवाहन पिकुळे प्रशालेचे माजी मुख्याध्यापक अन्वर नाईक यांनी केले. यावेळी अंकुश जाधव, महेश धोत्रे, प्रकाश गवस, नंदकुमार नाईक, प्रदीपकुमार कुडाळकर आदींनी आपले मनोगते व्यक्त केली. या प्रदर्शनाला एकूण 58 मॉडेल आली आहेत. गटशिक्षणधिकारी निसार नदाफ यांनी आपल्या प्रस्ताविकातून विज्ञान प्रदर्शनाचे महत्व विद्यार्थ्यांच्या जीवनात कसे आहे. तंत्रज्ञान आणि खेळणी हा विषय या प्रदर्शनाला का देण्यात आला याबद्दल विशेष मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक परेश देसाई केले तर आभार मुख्याध्यापक स्नेहल गवस यांनी मानले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा