सावंतवाडी
महाराष्ट्र राज्य परिक्षा पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवीच्या वआठवीच्या स्कॉलरशीप परिक्षेत नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती प्राप्त केली .आठावीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत आर्यन अरविंद गोवेकर याने २१६ गुण प्राप्त करुन ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादित तालुक्यात दुसरा क्रमांक प्राप्त केला. तर प्रणया परशुराम राऊळ हिने २१२ गुण प्राप्त करुन तिसरा क्रमांक मिळविला
वैभवी दिपक वजराठकर हिने १८४ गुण तसेच काजल राजाराम घोंगे हिने १६४ गुण मिळवून ग्रामीण सर्वसाधारण राष्ट्रीय शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे.या आठवीच्या विद्यार्थ्यांना नेमळे विद्यालयाचे शिक्षक किरण वेटे,नितीन धामापूरकर ,एल.आर.जाधव, चंद्रकांत बंगाळ यांचे मार्गदर्शन लाभले. यावर्षी सहावीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थीनी स्वराली विनायक साठे हिने २७२ गुण प्राप्त केले .उत्कर्षा रविंद्र वेगुर्लेकर हिने २४८ गुण प्राप्त केले तसेच इश्वरी रविंद्र वेंगुर्लेकर हिने २३०गूण प्राप्त केले या सर्व विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे उत्कर्षा वेगुर्लेकर व इश्वरी वेंगुर्लेकर या दोन्ही विद्यार्थीनीनी सांगेली येथील नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश घेतला आहे.राष्ट्रीय शिष्यवृत्ती प्राप्त केल्याबद्दल या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आ.भि.राऊळ ,प्राचार्या कल्पना बोवलेकर,तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी सर्व उत्तिर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे