जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री.अरुण देशपांडे लिखित श्री.गोंदवलेकर महाराज काव्यचरितावली
श्रीगोंदवलेकरमहाराज काव्यचरितावली-काव्यपुष्प- ९ वे
रोजच्या दिनक्रमाला श्रीमहाराज कंटाळले
घरी, गोंदवल्यात राहूनही ते बेचैनसे राहिले
वागण्यात त्यांच्या बराच फरक तो पडला
प्रहरी रात्रीच्या ते ध्यानात फार राहू लागले ।।
पाहुनी हे रावजी-गीतामाईंनी विचार केला
लावून देऊ लग्न नातवाचे निर्धार ही झाला
मोठ्या थाटात श्रीमहाराजांचे लग्न लावले
नव्या जोडीला घेऊन रावजी पंढरीला गेले ।।
श्रीमहाराजांच्या जीवनात पंत आजोबांचे
स्थान मोठे भावनिक महत्वाचे हो आहे
आजारी आजी राधाबाईंच्या पाठोपाठच
पंतांनीही देह ठेवणे अतिशय दुःखाचे आहे ।।
पंत रावजी खरे गोंदवले -भूषणच होते
यांच्या सहवासात श्रीमहाराज हो घडले
पंत आजोबांच्या भावभक्ती,सद्गुणांचे
श्रीमहाराजाकडून सदा आचरण घडले ।।
म्हणे अरुणदास -श्रीसद्गुरूची कृपा आहे
लेखनात मज नित्य भास होतो आहे ।।
———— —— – —————–
-अरुण वि .देशपांडे-पुणे
9850177342