You are currently viewing राष्ट्रीय लोक अदालत ११ फेब्रुवारीला

राष्ट्रीय लोक अदालत ११ फेब्रुवारीला

राष्ट्रीय लोक अदालत ११ फेब्रुवारीला

सिंधुदुर्गनगरी

राष्ट्रीय लोक अदालतीचे ११ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजन करण्यात आली आहे. या लोकन्यायालयामध्ये महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. मुंबई व वसंतराव नाईक विमुक्त व भटक्या जाती व जमाती महामंडळमुंबई यांची थकीत कर्ज प्रकरणे लोकन्यायालयात ठेवली जाणार आहेत. या लोकन्यायालयामध्ये थकीत कर्जदाराने तडजोड करावी व उपरोक्त योजनेतील व्याज सवलतीचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी.बी. म्हालटकर यांनी केले आहे.

       इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. मुंबई यांजकडील ओबीस महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरकमी भरणा करणाऱ्याया लाभार्थीस थकीत व्याज रक्कमेत ५० टक्के सवलत देण्याबाबतची एकरकमी परतावा (OTS) योजना लागू करण्यात आलेली आहे.

         तसेच वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्यादित)मुंबई महामंडळाच्या योजनेअंतर्गत लाभार्थ्याकडे थकीत असलेले कर्जावरील व्याजामध्ये एक रकनी समझोता (One Time Settlement) योजनेअंतर्गत व्याजामध्ये ५० टक्के सवलत देण्यात आलेली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा