मालवण
फेस्कोम संलग्न जेष्ठ नागरिक सेवा संघ हडीच्या वतीने जेष्ठ नागरिक व ग्रामस्थांची मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा ८० नेत्र रुग्णांनी लाभ घेतला. त्यापैकी २० रूग्णांवर अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यावेळी विवेकानंद नेत्रालय कणकवलीचे डॉ.संदीप कदम, सौ रूपा सांडव उपस्थित होते.
शुभारंभ प्रसंगी अशोक कांबळी, अध्यक्ष श्रीमती चंद्रकला कावले, दिलीप करंदीकर, उमेश हडकर, सूर्याजी पाटील, मनाली फाटक, सौ संपदा परब, ग्राम.सदस्य भरत लाड, सुवासिनी वाळवे, प्रज्ञा सुर्वे, प्राची मयेकर,दीक्षा गावकर, उपाध्यक्ष रामचंद्र हडकर, सचिव सुभाष वेंगुर्लेकर, सल्लागार चंद्रकांत पाटकर, उपसचिव रमाकांत सुर्वे, कोषाध्यक्ष मोहन घाडीगांवकर, लेखापाल प्रभाकर तोंडवळकर, दिनकर सुर्वे, शांताराम साळकर, सदस्य गणू परब, गणेश परब, शंकर पाटील, जानू कदम, सौ प्रज्ञा तोंडवळकर, रमेश कावले, सौ. वनिता हडकर, सौ. मनीषा पोयरेकर, श्रीधर परब, प्रभाकर चिंदरकर आदी उपस्थित होते. स्वागत श्रीमती चंद्रकला कावले, सुत्रसंचलन चंद्रकांत पाटकर, आभार सुभाष वेंगुर्लेकर यांनी मानले.