शालेय स्तरावर १२ जानेवारी रोजी आपत्ती प्रात्यक्षिके
सिंधुदुर्गनगरी,
शाळा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून शाळेच्या दर्शनी भागात ही योजना ठळकपणे दर्शवणे व वर्षातून दोन वेळा शालेय व्यवस्थापनद्वारे शाळास्तरावर आपत्ती प्रात्यक्षिके घेणे अपेक्षित आहे. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक घ्यावयाचे आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रात्यक्षिकाची पूर्व कल्पना पालक, विद्यार्थी व समाज माध्यमांना देण्यात यावी म्हणजे अफवेमुळे अनुचित प्रकार घडणार नाही. मुख्याध्यापकांनी योग्य ती सर्व काळजी घेऊन प्रात्यक्षिक पूर्ण करावयाचे आहे. यानुसार दि.१२ जानेवारी २०२३ रोजी सर्व शाळामधून आपत्ती प्रात्यक्षिके घेतले जाणार आहे. अशी माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य ए.पी.तावशीकर यांनी दिली.
शाळा बालक सुरक्षा मानके यासाठी १० गुण देण्यात आलेले आहेत. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, यांच्यामार्फत जिल्हास्तरीय शालेय आपत्ती व्यवस्थापन आराखडा प्रशिक्षण दि.२३ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १०.०० ते ५.०० या वेळेत पार पडले. या प्रशिक्षणाद्वारे जिल्हास्तरावर ७५ मार्गदर्शक तयार करून सर्व तालुक्यातील बिटस्तरावर प्रती जि.प.शाळा व माध्यमिक अनुदानित शाळा १ शिक्षक याप्रमाणे १६०५ शिक्षकांना आपली व्यवस्थापन आराखडा व आपत्ती प्रात्यक्षिकेचे प्रशिक्षण संपन्न झाले.