You are currently viewing दोडामार्ग तालुक्यातील साईश लोंढेचे सीए परीक्षेत यश

दोडामार्ग तालुक्यातील साईश लोंढेचे सीए परीक्षेत यश

दोडामार्ग

दोडामार्ग तालुक्यातील कोनाळ गावच्या सुपुत्राने सीए च्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवून कोनाळ गावचे नाव उज्वल केले आहे. साईश हा दोडामार्ग तालुक्यात दोन तपाहून अधिक काळ एलआयसीची दर्जेदार सेवा देणाऱ्या विमा सल्लागार अशोक लोंढे व अश्विनी लोंढे या उभयतांचा सुपुत्र आहे. त्याच्या या यशाबद्दल कोनाळ गावांसह तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

गेली कित्येक वर्ष एलआयसी मध्ये विमा प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या अशोक लोंढे यांनी त्यांच्या मुलाला उच्च शिक्षण देत सीए केल्याने त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे. कोनाळ गावात जन्मलेल्या साईशने सीए सारख्या कठीण परीक्षेत पहिल्याच प्रयत्नांत यश मिळविल्याने त्याचं हे यश दोडामार्ग तालुक्यातील युवा वर्गासाठी भविष्यकाळात एक मोठी प्रेरणा ठरणार आहे. दोडामार्ग तालुक्यात प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर गोव्यात पुढील शिक्षण घेऊन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया तर्फे घेण्यात आलेल्या नोव्हेंबर 2022 मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये साईशने प्रथम श्रेणीत यश संपादन केल आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − 2 =